'राष्ट्रभक्ती एका समाजाची मक्तेदारी नाही '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

जळगाव - देश हा मूठभर लोकांसाठी नसून लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले लोकराज्य आहे. राज्यात सध्या गंभीर स्वरूपाचे वातावरण झाले आहे, तसेच आर्थिक विषमता वाढल्याने गरीब अधिक गरीब होत आहेत. त्यामुळे सामाजिक विषमता वाढत आहे. समता परिषदेमुळे आपण आर्थिक, सामाजिक विषमता दूर करून राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन देशावर मात करू शकू, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. 

नूतन मराठा सभागृहात समता अभियानाच्या पहिल्या विभागीय परिषदेचे आयोजन आज करण्यात आले, त्यात बोलत होते. याप्रसंगी डॉ. नामदेव कस्ते, दीपक गायकवाड, मोहम्मद पटेल, क्रांतिकारी संसारे, शेखर सोनाळकर, डॉ. करीम सालार, गफ्फार मलिक, भीमराव गायकवाड, आरीफ मेमन, अंजुम वाहीद, निलोफर कलीम, मुकुंद सपकाळे, विवेक ठाकरे, खलिल देशमुख आदी व्यासपीठावर होते.
 
डॉ. मुणगेकर यांच्या "समता अभियान‘ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. डॉ. मुणगेकर म्हणाले, की देशात राष्ट्रवादाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती का? भारतावर कोणत्याही एकाच समाजाची मालकी मान्य नाही. देशात जितका अधिकार हिंदूंना आहे तितकाच इतरांनाही आहे. अनेक वर्षांपासून देशाचे संरक्षण विविध धर्मांनी केले आहे. त्यामुळे मुस्लिमांना आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही.
 
सावित्रींमुळे मुली शिकल्या
आपल्या देशात महिलांना स्वातंत्र्य नसताना शिक्षणाच्या व सामर्थ्याच्या जोरावर महिलांनी प्रगती केली. यात मुस्लिम महिलाही आघाडीवर आहेत. देशात मुस्लिम महिला पायलट असून, ही अभिमानास्पद बाब आहे. सावित्रीबाई फुलेंमुळे महिलांना शिक्षण शक्‍य झाले आहे. म्हणूनच 3 जून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असल्याने हा दिवस खास महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करावा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: "Patriotism is not the monopoly of a society '