पेमेंट थकल्याने स्मॉलस्केल इंडस्ट्रीज अडचणीत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

‘नोटाबंदी’चा परिणाम - ‘एमआयडीसी’तील उलाढाल निम्म्यावर
जळगाव - ‘नोटाबंदी’च्या निर्णयाने सर्वच उद्योगांवर परिणाम झाला आहे. यातच मोठ्या कंपन्यांशी जोडून असलेल्या स्मॉलस्केल इंडस्ट्रीजला अधिक फटका बसला आहे. मुळात काही उद्योगांमधून शासकीय कार्यालयांना माल पुरविला जातो. परंतु, माल पुरविल्यानंतरही त्याच्या बिलाची रक्‍कम अदा न करता रोखून ठेवण्यात आली आहे. यामुळे स्मॉलस्केल इंडस्ट्रीज अडचणीत आली आहे.

‘नोटाबंदी’चा परिणाम - ‘एमआयडीसी’तील उलाढाल निम्म्यावर
जळगाव - ‘नोटाबंदी’च्या निर्णयाने सर्वच उद्योगांवर परिणाम झाला आहे. यातच मोठ्या कंपन्यांशी जोडून असलेल्या स्मॉलस्केल इंडस्ट्रीजला अधिक फटका बसला आहे. मुळात काही उद्योगांमधून शासकीय कार्यालयांना माल पुरविला जातो. परंतु, माल पुरविल्यानंतरही त्याच्या बिलाची रक्‍कम अदा न करता रोखून ठेवण्यात आली आहे. यामुळे स्मॉलस्केल इंडस्ट्रीज अडचणीत आली आहे.

पन्नास दिवसांपूर्वी झालेल्या ‘नोटाबंदी’मुळे उद्योगांवर मंदीचे सावट उभे राहिले होते. या काळात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे अनेक युनिट बंद ठेवावे लागले होते. ही परिस्थिती केवळ जळगाव ‘एमआयडीसीची नाही, तर राज्यभरातील आहे. तयार होणाऱ्या मालाला मागणी होत नसल्याने उत्पादन घटले आणि याचा परिणाम उलाढालीवर झालेला आहे. एकीकडे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले जात होते, तर दुसरीकडे बिझिनेस मंदावत असल्याच्या प्रतिक्रिया उद्योजकांकडून मांडल्या जात होत्या.

माल पोहोचला; पण बिल रोखले
शासकीय कार्यालयांकडून जनतेसाठी अनुदानावर वस्तू उपलब्ध करून दिल्या जात असतात. प्रामुख्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांद्वारे अनुदानावर साहित्य दिले जात असते. हे साहित्य बनविणाऱ्या शहरातील काही कंपन्यांमधून शासकीय कार्यालयांना माल पुरवठा करण्यात आला आहे. नोटाबंदी झाल्यानंतर सदर कार्यालयांकडून मालाचे बिल रोखले आहेत. ४५ दिवसांच्या आत बिल अदा करण्याचा नियम असताना बिल रोखून ठेवण्यात आल्याने उद्योजक अडचणी सापडले आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने माल उचलत नसल्याने सदरची समस्या निर्माण झाली आहे.

बाराशे स्मॉलस्केल इंडस्ट्रीज
जळगाव एमआयडीसीत चटई, पाइप, डाळ उद्योग या प्रमुख उद्योगांना जोडून असलेले प्लास्टिक व इंजिनिअरिंग (मेन्टेनन्स) असे मिळून बाराशे उद्योग आहेत. स्मॉलस्केल इंडस्ट्रीजमधून महिन्याला साधारण पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु दीड महिन्याच्या कालावधीत ही उलाढाल निम्म्यावर आली आहे. इतकेच नव्हे, तर मालाची मागणी कमी झाल्याने आणि कामगारांचे रोखीने पगार करणे शक्‍य होत नव्हते. परिणामी कामगारांना आठ- दहा दिवसांचा ब्रेक दिला जात असल्याने कंपन्यांमधील काही युनिट हे बंद ठेवावे लागले. याचा मोठा फटका संपूर्ण एमआयडीसीला बसला आहे.

‘नोटाबंदी’चा निर्णय चांगला आहे, याचे सर्वांनीच स्वागत केले. परंतु उद्योग- कंपनीसाठी हा कालावधी मंदीचा राहिला. परिणामी उलाढालीवर निम्मे परिणाम झाला असून, यातून सावरण्यासाठी सरकारने काही नवीन स्कीम आणायला हवी.
- चंद्रकांत बेंडाळे, अध्यक्ष, स्मॉलस्केल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, जळगाव

Web Title: Payment stop smallscale Industries in problem