बॅंकेबाहेर नाशिककर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

चार हजारांसाठी दहा तास रांगेत; बाजारपेठ ठप्पच

नाशिक - चलनातील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आजपासून बॅंकांमध्ये रिझर्व्ह बॅंकेच्या अटींनुसार किमान चार हजार रुपये बदलून घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्या. काही बॅंकांमधून केवळ नव्याने चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्याच नोटा दिल्या जात असल्याने सुट्या पैशांची समस्या उभी राहिली.

सर्वसामान्यांना आज कामधंदा सोडून बॅंकांबाहेर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले. नोटा बंदीचा परिणाम आजही बाजारपेठांत दिसला. सुट्या पैशांअभावी अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.

मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीनंतर ‘एटीएम’मधून पैसे काढणे व सीडीएममध्ये पैसे भरणे बंद होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांची एटीएम केंद्राबाहेर झुंबड उडाली. त्यामुळे आज सर्व जण बॅंका सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. बॅंका सकाळी साडेदहाला सुरू होणार असल्या, तरी सर्वसामान्यांनी मात्र सकाळी आठपासून बॅंकांच्या बाहेर रांगा लावल्या. अनेकांना खात्यातून रक्कम काढायची होती, तर काहींना आपल्या नोटा चार हजार रुपये नवीन चलनात बदलून घ्यायच्या होत्या. हाती पैसा नसल्याने तातडीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिकही रांगेत उभे राहिले. 

तासन्‌तास रांगा अन्‌ रांगेत नाश्‍ता
हाती पैसा असूनही अनेकांना घरासाठी रोजचा किराणा भरता आला नाही. अनेकांना गरजेच्या वस्तूही विकत घेता आल्या नाहीत. बहुतांश नागरिकांना हातचे काम सोडून बॅंकांच्या बाहेर भल्या सकाळी सात-आठपासून तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली. परिणामी, अनेकांना रांगेतच समोसा, वडापावचा नाश्‍ता करावा लागला. साडेदहाच्या ठोक्‍याला बॅंका जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा बॅंकांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच जुन्या नोटा घेऊन चार हजार रुपयांच्या स्वरूपात चलन देणे सुरू केले. ओळखपत्र दाखविले तरी पैसे मिळणार, असे समजून अनेकांनी फक्त आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना यांसारखी ओळखपत्रेच आणली; तर बॅंकेला त्या ओळखपत्राची छायांकित (झेरॉक्‍स) प्रत पाहिजे असल्याने अनेकांना पुन्हा रांग सोडून छायांकित प्रत काढण्यासाठी बाहेर पडावे लागल्याने अनेकांना असाही मनस्ताप सहन करावा लागला.

काउंटरच्या संख्येत वाढ
जुने चलन बदलून नवीन चलन घेण्यासाठी बॅंकांमार्फत काउंटरच्या संख्येत वाढ करण्यात आली. नागरिकांमध्ये लक्षणीय संख्या चलन बदलून घेण्यासाठीची जास्त असल्याने या स्वरूपाचे काउंटर दुपटीने वाढविण्यात आले. खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्‍कम काढण्यासाठी व जमा केल्यानंतर नवीन चलनात हवी असलेली रक्कम घेण्यासाठीच्या काउंटरमध्येही दुपटीने वाढ करण्यात आली. खात्यावर रकमा भरण्यासाठीचे काउंटरमध्ये गर्दीच्या परिस्थितीनुसार बदल केले जात होते.

दोन हजारांच्या नोटांमुळे उद्‌भवली समस्या
बॅंकांमधून नवीन चलन देणे सुरू झाले खरे; परंतु काही शाखांमधून प्रतिव्यक्‍ती चार हजार रुपये देताना दोन-दोन हजारांच्या नोटाच दिल्या गेल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला. बाहेर बाजारात दोन हजार रुपयांची नोट नेल्यानंतर विक्रेत्याकडे वस्तू खरेदी केल्यावर उर्वरित सुटे पैसे देण्यासाठीची रक्कम नसेल तर पुन्हा वाद होणार होता. असे खटके अनेक ठिकाणी उडाल्यानंतर मग दोन हजारांची एक नोट व उर्वरित दोन हजार रुपये हे १०० रुपयांच्या चलनात देणे सुरू करण्यात आले.

Web Title: people line to bank in nashik