अंदरसूल : गावोगाव नागरिकांची लोटा परेड

अंदरसूल : गावोगाव नागरिकांची लोटा परेड

अंदरसूल : जिल्ह्यात 2012 च्या बेसलाइन सर्वेनुसार पाच लाख 27 हजार 14 पैकी तीन लाख 25 हजार आठशे 10 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेवुन शंभर टक्के जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला आहे. मात्र आजही गावोगावी शौचाला नागरिक माळरान शोधून लोटा परेड करत आहेत. त्यामुळे कागवादर आकडे गाठले पण प्रत्यक्षात वापराचे उद्दीष्ट कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरित आहेच.

हागणदरी मुक्त गावे झाली तरच स्वच्छ व सूंदर भारत होईल. या हेतूने अनुदान देऊन वैयक्तिक शौचालय बांधणीला  2013-14 सुरुवात झाली. त्यामध्ये सहा हजार सहाशे 81 वैयक्तिक शौचालय बांधले. पुढे 2014-15 ला 28 हजार चारशे 17, 2015-16 ला 36 हजार पाचशे 85 , 2016-17 ला एक लाख चार हजार तीनशे 57, आणि 2017-18 ला एक लाख 44 हजार 395  वैयक्तिक  शौचालय बांधले असून संपुर्ण जिल्ह्यात पाच हजार 177 सार्वजानिक शौचालय बांधून डोळ्यासमोर ठेवलेल्या बेसलाईन उदिष्ठे सर्वेनुसार 2018 पर्यंत 3 लाख 20 हजार 633 शौचालय बांधून शंभर टक्के उदिष्ठे पूर्ण केले आहे. 

संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा स्तरावरुन शासनाने गाव पातळीवर जावून गुड़ मॉर्निंग पथक,पथ नाटिकाद्वारे जनजाग्रुती केली. मात्र ग्रामीण भागात शौचलयाचा नीट वापार न होता अजुन ही लोटा परेड होतांना दिसते.यासाठी शौचालय नियमित वापरासाठी शासनच्या वतीने शास्वतता हा उपक्रम हा राबविला जाणार आहे.

असे मिळते  वैयक्तिक शौचालयसाठी अनुदान 

स्वच्छ भारताचे स्वप्न साकरण्यासाठी वैयक्तिक शौचालयसाठी उपलब्धता आणि वापर या गोष्टीवर भर देवून शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहनपर अनुदान बारा हजार देण्याचा निर्णय शासनाने घेतला. केंद्र व राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण करून स्वच्छ भारत मिशन करण्यात आले. या मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधनीसाठी केंद्राचे नऊ हजार व राज्याचे तीन हजार रूपये असे एकूण बारा हजार रूपये प्रोत्साहन पर अनुदान शौचालय बांधनीसाठी दिले जाते.

याआधी निर्मल भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचलयासाठी 4600 तर मनेरेगा अंतर्गत 4500 असे एकूण 9100 रुपये मिळत होते. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक शौचलयासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले असून आता हा निधी स्वच्छ भारत मिशन मधून देण्यात येत आहे.

"गावातील ग्रामस्थांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी संपूर्ण गाव हगणदारीमुक्त करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला असून गाव परिसरातील देवस्थानी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्या ठिकाणी ही शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे."
- विनिता सोनवणे,सरपंच अंदरसूल

तालुका निहाय जिल्ह्यात पूर्ण झालेली शौचालयची कामे
तालुका | कुटुंब सर्वे  | एकूण उद्दीष्ठे | पूर्ण शौचालय | पूर्ण

बागलाण - 48910  | 285569  |  11624 | 25928

चांदवड   - 34358  | 22464    |  12469 | 22464

देवळा     - 21142  | 13218    |  24        | 13190

दिंडोरी    -  41699  |  23131   |  11912 | 23061

इगतपुरी  -  29573  |  18624   |  10255 | 18197

कळवण  - 24102   |  12023   |  11        | 12023

मालेगाव -  67157   |  53814  |  26362  | 52059

नांदगाव  -  29519  |  22194   |  14344  |  22194

नाशिक  -  24223   |  9173     |   0          |  8917

निफाड  -  66308   |  31656   |  6134    |  31656

पेठ      -   17967   |  12310   |  5180   |  12310

सिन्नर  -    38475   |  23302   | 14172 |  23302

सुरगाणा -  25421   |  18177  | 10741  |  18177

त्रंबक    -   23142   |  12949  |  6112   | 12949

येवला   -   35818   |  24206  | 15055   |  24206

एकूण  -  527814  | 325810  | 144395 | 320633

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com