रेल्वे काऊंटर, सुवर्णपेढ्यांसह पेट्रोलपंपावर नोटांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नाशिक- पाचशे-हजाराच्या नोटा बंद होताच, एटीएम, बॅंक, टपाल कार्यालयातील नोटांचे शटर डाऊन झाले. पण त्याचवेळी रेल्वे बुकींग काऊंटर, सुवर्णपेढ्यांसह पेट्रोलपंपावर नोटांचा वर्षाव झालाय. हे चित्र नाशिकच्या बाजारपेठांमध्ये आज (बुधवार) पाहायला मिळाले. बाजार समित्यांमध्ये येवल्यात शेतकऱ्यांनी पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या असून अडचण नसलेल्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांनी पैसे घेण्याची तयारी दर्शवली आहे. उमराणेमध्ये नोटांसह पन्नास दिवसात भरण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी मान्य केला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाच्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून धनादेश स्विकारण्यास पसंती दिली होती.

रेल्वे तिकीट बुकींग काऊंटरवर बंद झालेल्या नोटांचा वर्षाव झाल्याने प्रत्येकाला सुट्टे पैसे देताना कर्मचारी घामाघुम झालेत. दहा हजाराच्या पुढे पॅनकार्डचा पुढे आला आहे. पेट्रोलपंपावर पाचशेच्या पटीमध्ये पेट्रोल-डिझेल भरणाऱ्यांची रांग लागली होती. याशिवाय बसगाड्यांच्या प्रवासामध्ये सुट्या पैशांसाठी प्रवाशी एकमेकांमध्ये "ऍडजेस्टमेंट' करत असल्याचे दिसून आले. सुवर्णपेढ्यांमध्ये दागिन्यांची खरेदी चढ्या भावातही पाच तोळ्यांच्या पुढे सुरु होती. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची मात्र सुट्या पैशांच्या अभावी तारांबळ उडाली. रिक्षा, हॉटेलवाल्यांनी सुट्या पैशांच्या मागणीचा सपाटा सुरु केला होता. दुसरीकडे मात्र अध्यात्मिक विधी झाल्यावर दक्षिणा रुपाने भाविकांनी पाचशे-हजारांची नोट हातावर ठेवल्याने पुरोहित जाम खुष होते.

टोलनाक्‍यावर लांबच लांब रांगा
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंतच्या टोलनाक्‍यावर नोटावरुन वाहनचालक आणि नाका कर्मचाऱ्यांवर वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: people using 500,1000 notes in petrol pump