जनता आता भाजपला घरी बसवणार- चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी उरलेल्या सर्व राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत आघाडी करणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला यश मिळाले आहे. तेथील जनतेने भाजपाला आता नाकारलेले आहे, हे या तिन्ही राज्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. नागरिक मोदी सरकारला कंटाळले आहे, म्हणून जनताच आता भाजपाला घरी बसवणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

नाशिक- काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी उरलेल्या सर्व राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत आघाडी करणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला यश मिळाले आहे. तेथील जनतेने भाजपाला आता नाकारलेले आहे, हे या तिन्ही राज्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. नागरिक मोदी सरकारला कंटाळले आहे, म्हणून जनताच आता भाजपाला घरी बसवणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

नाशिक शहर काँग्रसे कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या कन्येच्या विवाहास पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी नाशिकमधील लंडन पॅलेस येथे त्यांनी वधू-वरास शुभेच्छा व भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, काल रविवारी (ता.16) त्यांनी औरंगाबादमध्ये बोलताना पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्‍यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पक्षांसोबत कॉंग्रेस आघाडी करणार आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.

Web Title: People will pull BJP down from power Says EX Cm Chavan