महिनाभरात पेट्रोल, डिझेल दहा रुपयांनी स्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जळगाव : ऑक्‍टोबरच्या सुरवातीला राज्यातील अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केलेल्या पेट्रोलच्या व ऐंशीच्या घराजवळ पोहोचलेल्या डिझेलच्या दरात महिना-दीड महिन्यात टप्प्या-टप्प्याने घट होत हे दोन्ही प्रकारचे इंधन दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरात आजचा पेट्रोलचा दर 78.41 रुपये, तर डिझेल 69.41 रुपये प्रतिलिटर होते. 

जळगाव : ऑक्‍टोबरच्या सुरवातीला राज्यातील अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केलेल्या पेट्रोलच्या व ऐंशीच्या घराजवळ पोहोचलेल्या डिझेलच्या दरात महिना-दीड महिन्यात टप्प्या-टप्प्याने घट होत हे दोन्ही प्रकारचे इंधन दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरात आजचा पेट्रोलचा दर 78.41 रुपये, तर डिझेल 69.41 रुपये प्रतिलिटर होते. 

महागाईचे मूल्यमापन करणारा प्रमुख घटक असलेल्या इंधनाचे दर मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठेही कमी झाल्याचे दिसले नाही, उलटपक्षी गेल्या ऑक्‍टोबरमध्ये तर अनेक शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली तर डिझेलच्या दरानेही ऐंशीचा आकडा गाठला होता. 

अर्थमंत्र्यांचा दिलासा 
वाढत्या इंधनदराने झोप उडालेल्या केंद्र सरकारमधील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 4 ऑक्‍टोबरला पेट्रोल व डिझेलवरील अबकारी शुल्क लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांनी कमी केले, तसेच राज्यांनाही निर्देश देत तेवढेच शुल्क कमी करण्यास सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलवरील शुल्क अडीच रुपये तर डिझेलवरील शुल्क दीड रुपयाने घटवले. त्यामुळे राज्यात पेट्रोल पाच तर डिझेल चार रुपयांनी स्वस्त झाले होते. 

जळगावात होता 92 रुपये दर 
या निर्णयाआधी 4 ऑक्‍टोबरला जळगावात पेट्रोलचा दर 92 रुपये 26 पैसे तर डिझेलचा 79 रुपये 71 पैसे प्रतिलिटर असा दर होता. केंद्र व राज्याच्या उत्पादन शुल्कातील कपातीने हा दर 5 ऑक्‍टोबरला कमी होऊन पेट्रोल 87.91 रुपये व डिझेल 77.18 रुपये प्रतिलिटर झाले. त्यानंतरही 15 ऑक्‍टोबरपर्यंत हा दर सातत्याने वाढतच होता. 15 ऑक्‍टोबरला जळगावात पेट्रोलचा दर 89.11 रुपये तर डिझेल 78.78 रु. प्रतिलिटर मिळत होते. 

पुन्हा दर घटण्यास सुरवात 
21 ऑक्‍टोबरपासून मात्र इंधनाचे दर टप्प्याटप्प्याने घटत गेले. 25 ऑक्‍टोबरला पेट्रोल 87.52 व डिझेल 78.14 रुपये प्रतिलिटर झाले. आता परवाच 30 नोव्हेंबरला पेट्रोलने ऐंशीच्या खाली व डिझेलने सत्तरीकडे घसरण केली. यादिवशी पेट्रोल 79.52 व डिझेल 70.86 रु. प्रतिलिटर हा दर गाठला. तर आज 4 डिसेंबरला पेट्रोलचे जळगावातील दर -- तर डिझेलचे --- रुपये प्रतिलिटर होते. 

असे घटत गेले दर 
तारीख-------पेट्रोल------ डिझेल 
4 ऑक्‍टो. ----92.26 ----79.11 
5 ऑक्‍टो. ----87.91 ----77.18 
10 ऑक्‍टो. ---88.66 ----77.63 
15 ऑक्‍टो. ---89.11 ----78.78 
20 ऑक्‍टो. ----88.39 ---78.67 
25 ऑक्‍टो. ----87.52 ---78.14 
30 ऑक्‍टो. --- 86.0 ---- 77.03 
5 नोव्हें. ------ 85.09 ----76.44 
10 नोव्हें. -----84.43 ---- 75.84 
15 नोव्हें.---- 83.83------ 75.33 
20 नोव्हें.---- 82.95------ 74.48 
25 नोव्हें.---- 81.5--------- 72.9 
30 नोव्हें.------ 79.56----- 70.86 
4 डिसेंबर-----78.41------- 69.41
 

Web Title: petrol diesel price decreases in a month