मारवड मंडळातील 18 गावे  पीक विमा यादीमधून गायब! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

मारवड मंडळातील 18 गावे 
पीक विमा यादीमधून गायब! 

कळमसरे (ता. अमळनेर) : पीक विम्यापतून मारवड मंडळातील सुमारे अठरा गावे वगळण्यात आली आहेत. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्‍त होत आहे. प्रशासनाने दखल घेऊन लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. 
गेल्या 2017- 18 या कालावधीत परिसरातील शेतकऱ्यांनी विकास संस्थेच्या माध्यमातून पीककर्ज घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर पीक विमाही उतरविण्यात आला होता. मात्र, मारवड मंडळातील अठरा गावेच यादीतून गायब असल्याने संताप व्यक्‍त होत आहे. 

पावसाळा अत्यल्प झाल्याने शासनाने पीक विमा मंजूर केल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत असताना, कळमसरे परिसरातील शेतकरी वंचित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. कळमसरे येथील 311 नियमित शेतकऱ्यांनी विकास सोसायटीतून पीककर्ज घेतले होते. काही थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीककर्ज न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकेतून पीक विमा उतरविला होता. त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली असून, नियमित शेतकरीच वंचित राहिले आहेत. जिल्हा बॅंकेच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या तयारीत 
311 शेतकऱ्यांचा 406 हेक्‍टर 0.5 आर एवढ्या शेती क्षेत्रफळावर पाच लाख 83 हजार 84 रुपयांचा पीक विमा मुदतीत काढला. सुमारे 86 लाख 75 हजार 773 रुपये 20 पैसे एवढी रक्कम पीक विम्याची भरपाई मिळणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत गावाची यादीच गायब असल्याने शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्हा बॅंकेने पाठपुरावा करून याकामी लक्ष न घातल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 
ही गावे यादीतून वगळली 
कळमसरे, गडखांब, निमझरी, दहिवद, पिंपळे, बहादरवाडी, हिंगोणे, निम, मुडी, दरेगाव, अंतुर्ली, खेडी, वासरे, खरदे, जैतपीर, निंभोरा, ढेकू, मांडळ. 

तालुक्‍यातील 11 हजार 359 नियमित सभासदांनी दोन कोटी दोन लाख एवढी पीक विमा रक्कम भरली आहे. तांत्रिक अडचणीमुळे 18 गावांतील याद्यांमधील लाभार्थी वंचित राहिले. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. 
 जे. के. पाटील, विभागीय अधिकारी, जिल्हा बॅंक 
 
Web Title: pik