जिल्ह्यात पिके करपली;  पैसेवारीत मात्र समृद्धी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

जिल्ह्यात पिके करपली; 
पैसेवारीत मात्र समृद्धी 

जळगावः जिल्ह्यात पावसाअभावी खरिपातील पिकांवर मोठे संकट उभे आहे. पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत. आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र पावसाची शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पिकांची नजर पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त दाखविली आहे. यामुळे जिल्ह्यात कागदावर तरी हंगामाची समृद्धी दाखविण्यात आली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजा जेमतेम बरसला. पण, त्याने केवळ सरासरी भरून काढण्याचे काम केले आहे. कुठे नदी नाल्यांना पूर नाही, की धरणसाठ्यांत वाढ होईल अशीही स्थिती नाही. शिवाय पावसाने पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळापासून दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला खरीप हंगामच संकटात आला आहे. पावसाअभावी खरिपाच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. अशा नजर आणेवारी पन्नास पैशांवर दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांना आता शासनही वाली राहिले नाही, अशी परिस्थिती आहे. 

सप्टेंबर महिन्यात पिकांच्या स्थितीचा अंदाज पावसावरून ठरविला जातो. पाऊस चांगला झालेला असेल, पिकांची स्थिती चांगली असेल, तर पन्नास पैशांच्या वर पैसेवारी लावली जाते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पिकांची नाजूक स्थिती आहे. अनेक ठिकाणी पिके कोमेजण्याच्या स्थितीत आहे. जमिनींना भेगा पडल्या आहेत. पण, प्रशासनाची पैसेवारी मात्र समृद्धीचे गाणे गात आहे. जिल्ह्यात 1 हजार 502 गावांचा समावेश आहे. एकही गाव 50 पैशांच्या आत नाही. यामुळे एकही गाव सध्या तरी दुष्काळाच्या छायेत नसल्याचे दिसून येत आहे. 
..... 
तालुकानिहाय गावे 

जळगाव 92, जामनेर 152, एरंडोल 65, धरणगाव 89, पारोळा 114, भुसावळ 54, बोदवड 51, मुक्ताईनगर 81, यावल 84, रावेर 121, पाचोरा 129, भडगाव 63, अमळनेर 154, चोपडा 117, चाळीसगाव 136. एकूण 1502 
..... 
इन्फोबॉक्‍स 

पावसाची टक्केवारी 
जळगाव 59.2 
जामनेर 59.6 
एरंडोल 83.8 
धरणगाव 79.8 
भुसावळ 49.7 
यावल 52.8 
रावेर 64.9 
मुक्ताईनगर 52.7 
बोदवड 67.6 
पाचोरा 61.2 
चाळीसगाव 62.2. 
भडगाव 57.4 
अमळनेर 55.9 
पारोळा 75.7 
चोपडा 62.2 
एकूण 62.8 
 
Web Title: pike