गिरणा धरणाने गाठली चाळिशी

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 26 जुलै 2017

पिलखोड (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) - गिरणा धरणात सुरु असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे आज सकाळ पर्यंत पाणीसाठा 40 टक्के झाला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान पाण्याची आवक मंदावली आहे.

सोमवारी(ता. 24) संध्याकाळपर्यंत गिरणात 36 टक्के साठा होता. काल मंगळवारी(ता. 25) रात्री आणि दिवस मिळुन चार टक्क्यांनी वाढ होऊन धरणात 40 टक्के साठा निर्माण झाला आहे. काल संध्याकाळी चणकापूर आणि पुनद धरणाचे एकत्रित मिळून 3 हजार 444 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकुण 10 हजार 368 दशलक्ष घनफुट पाणीसाठ्यापैकी 7 हजार 368 दशलक्ष घनफुट एवढा उपयुक्त साठा आहे. धरणात येणार्या पाण्याची आवक कमी झाली होती.

Web Title: pilkhod jalgav news girana dam water storage 40%