कर्नाटक एक्‍स्पेसवर दरोड्याचा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

रेल्वे पोलिसांनी पाठलाग करुन चार सराईतांना पकडले
भुसावळ - कर्नाटक एक्‍स्प्रेस १२६२८ अप वर दरोडा टाकण्याच्या डाव लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने उधळून लावला.

गस्ती पथकाने पाठलाग करुन चार सराईत गुन्हेगारांना पकडले. तर पाचवा संशयित फरारी झाला. ही घटना भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिमेस लोखंडी पुलाजवळील आऊटरवर घडली. मध्यरात्रीपासून ते पहाटे पावणे पाचपर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन ही कारवाई केली.  
गुन्हेगारांकडून लांब चाकुसह हत्यारे जप्त केली आहे. या एक्‍स्प्रेसची वेळ दुपारी पाऊणला आहे. मात्र आज ही गाडी उशिराने धावत होती.

रेल्वेस्थानक व परिसरात पहाटे १ वाजेच्या सुमाराला लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालत होते. तेव्हा लोखंडी पुलाजवळ अप मार्गावरील १२६२८ अप नवी दिल्ली-बेंगलोर कर्नाटक एक्‍स्प्रेस गाडी चेन पुलिंगने थांबविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अचानक चेन पुलिंग झाल्याने काहीतरी गडबड असल्याच्या संशय पोलिसांना आला व तशा संशयास्पद हालचाली झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तातडीने लोहमार्ग पोलिस कॉन्सटेबल शैलेश पाटील, जगदीश ठाकूर, कोळी व रेल्वे सुरक्षा बलाचे  एएसआय लवकुश वर्मा, सुनील सोनवणे, श्री.जेठे, बी. आर. अंभोरे, शेख नावेद, दीपक शिरसाठ यांच्या पथकाने लोखंडी पुलाकडे गाडीजवळ धाव घेतली. गाडीमध्ये काही संशयास्पद आढळले नाही. त्यांनी रेल्वे लाईन लगतच्या झोपडपट्टी पोलिसांनी तीन तास पिंजून काढली आणि लोखंडी पूल परिसरात गस्त ठेवली. अधिक शोध घेतला असता झोपडपट्टी भागात पहाटे ४.४० वाजेच्या सुमाराला इम्रान इमाम पिंजारी (वय १९), अमीन इमान पिंजारी, इमान हसन पिंजारी (रा. महात्मा फुले नगर), धीरज ऊर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरिया व मोहम्मद ॲटॅक हे पाच जण संशयास्पद फिरताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी हटकले असता ते पळू लागले, पोलिसांनी पाठलाग करुन त्यातील चार जणांना पकडले. तर मोहम्मद ॲटॅक पळून गेला. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आठ इंची लांब चाकू, मिरची पावडर, लोखंडी पहार आणि फायटर ही हत्यारे जप्त केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहे.

अटकेतील संशयित हिस्ट्रीशिटर
पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी इम्रान पिंजारी, धीरज ऊर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरिया, मोहम्मद ॲटॅक हे सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशिटर) असून त्यांच्यावर चोरी, चाकूचा धाक दाखवून लूटमार, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: planning flop on karnataka express robbery