जेसीआय अंबडतर्फे होळीनिमित्त रोपवाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

नाशिक - जेसीआय अंबडतर्फे आज होळीनिमित्त सभासदांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रोपांचे वाटप केले. बकुळ, पुत्रंजिवा, खैर, आपटे, कदंब, साग, मधुकामिनी अशा विविध रोपांचे वाटप झाले. अध्यक्ष नागेश पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प संयोजक पीयूष कुलकर्णी यांनी स्वागत केले. जेसीआयचे माजी स्टेट व्हाइस प्रेसिडेंट संदीप नाटकर, जेसी. प्रफुल्ल पारख, माजी महापौर यतीन वाघ, हरीश लोणारी आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की होळीच्या दिवशी गोवऱ्या व लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे वृक्षलागवडीला पर्याय नाही. एक झाड लावण्याने पुढचे वर्ष वापरण्याइतके ऑक्‍सिजन तयार करते.

नाशिक - जेसीआय अंबडतर्फे आज होळीनिमित्त सभासदांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रोपांचे वाटप केले. बकुळ, पुत्रंजिवा, खैर, आपटे, कदंब, साग, मधुकामिनी अशा विविध रोपांचे वाटप झाले. अध्यक्ष नागेश पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प संयोजक पीयूष कुलकर्णी यांनी स्वागत केले. जेसीआयचे माजी स्टेट व्हाइस प्रेसिडेंट संदीप नाटकर, जेसी. प्रफुल्ल पारख, माजी महापौर यतीन वाघ, हरीश लोणारी आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की होळीच्या दिवशी गोवऱ्या व लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे वृक्षलागवडीला पर्याय नाही. एक झाड लावण्याने पुढचे वर्ष वापरण्याइतके ऑक्‍सिजन तयार करते. जेसीआय अंबडचा हा उपक्रम स्तुत्य असून, याचा आदर्श इतर सेवाभावी संस्थेनेदेखील घ्यावा. माजी अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे, प्रमोद वाघ, चेतन पाटील, विशाल तांदळे, वृषाली खाकुर्डीकर, अश्‍विन सोनवणे, संग्राम देसाई, संदीप नीलकंठ, राजेश शेळके, विशाल पाटील, नीलेश देशमुख, हितेंद्र कोतकर, अक्षय विसपुते, रितेश मोरे आदी उपस्थित होते. सचिव सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Plant distribution by JCC in Ambad