आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांच्या गैरसोयीच्या वेळेत बदल करावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

येवला : आदिवासी विभागांतर्गत चालविल्या जाणार्या आश्रमशाळांची सध्याची वेळ विद्यार्थी व शिक्षकांसाठी गैरसोयीची आहे. त्यामुळे विभागाअंतर्गत सर्वच आश्रमशाळेची शाळांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत करावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे.

येवला : आदिवासी विभागांतर्गत चालविल्या जाणार्या आश्रमशाळांची सध्याची वेळ विद्यार्थी व शिक्षकांसाठी गैरसोयीची आहे. त्यामुळे विभागाअंतर्गत सर्वच आश्रमशाळेची शाळांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत करावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे.

नागपूर येथे सावरा यांच्या दालनात भेट घेऊन दराडे यांनी या मागणीचे निवेदन दिले तसेच सविस्तर चर्चा करून आश्रमशाळांच्या शिक्षकांची प्रलंबित असलेली ही मागणी तातडीने निकाली काढावी अशी मागणी केली. राज्यात ५५२ शासकीय आदिवासी आश्रमशाळांत २ लाख २१ हजारावर तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये २ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थी शिकत आहेत.जास्तीचा कालावधीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होतात.त्यामुळे निर्णय घेण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

सध्या आश्रमशाळांची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंतच असून ही वेळ शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची आहे.तब्बल आठ तास शिक्षकांना अध्यापन करणे व विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी हवी असलेली मानसिकता या प्रदीर्घ वेळेमुळे राहत नाही.सर्वांसाठी गैरसोयीची असणारी ही वेळ बदल करून पूर्ववत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्याची सर्व स्तरातून सातत्याने मागणी होत आहे.त्यामुळे या प्रश्नी चर्चा करण्यासाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी व निर्णय घ्यावा अशी मागणीही दराडे यांनी केली आहे. या प्रश्नी सावरा यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून यावर अपेक्षित निर्णय होण्याचा आशावाद असल्याचे दराडे यांनी सांगितले.

अगोदर आदिवासी विकास विभागाने सध्याच्या सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचपर्यंतच्या वेळेत बदल करीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत शाळा चालविण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या निर्यायाची अमलबजावणी झालेली नसल्याने शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.याचा विचार करून वेळेत बदल करण्याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: please change the improper timetable of tribal students school