पैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

येवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना...मुलीचे लग्न ठरवले आता हातात दमडी नाही, काय करावे हेही सुचेना...! अशी वेदना मांडत आमच्या घामाचे पैसे आम्हांला द्या..अशी व्यथा मांडत व टाहो फोडत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांनी शुक्रवार पासून येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

येवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना...मुलीचे लग्न ठरवले आता हातात दमडी नाही, काय करावे हेही सुचेना...! अशी वेदना मांडत आमच्या घामाचे पैसे आम्हांला द्या..अशी व्यथा मांडत व टाहो फोडत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांनी शुक्रवार पासून येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या कांद्याचे पैसे राजेंद्र धुमाळ व दत्तात्रय पैठणकर या दोघा व्यापाऱ्यांनी मिळून सुमारे ५० लाख रुपये थकवले आहे.दरम्यान, बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांना तसेच शेतकऱ्यांना ३० एप्रिल पर्यंत पैसे अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. जो पर्यंत रोख पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

मागील तीन महिन्यापासून हा प्रकार सूरु होता. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, राजकीय नेत्यांमार्फत शेतकर्‍यांवर दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव ,पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पैसे थकले असून यातील ५६ शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

उपोषणाआर्थी शेतकऱ्यांनी आज आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.शेतमाल कोणाच्या भरवशावर विकायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस आजही पत्र लिहून ठोस कारवाई करून हा विषय गार्ंभीयाने घ्यावा व शेतकर्यांचे पैसे त्वरीत रोखीने अदा करावे असे सांगितले आहे.

बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरणार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना लेखी आस्वासन दिले पण शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते योगेश पांडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, राज्य युवा प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलकांशी संपर्क साधून पाठींबा जाहीर केला आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे आंदोलनस्थळी उपस्थित होते.

हे शेतकरी बसलेय उपोषणाला..!
संपत आहेर, जगन्नाथ एंडईत, भास्कर कदम,कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण,पोपट बोरसे,साहेबराव सत्रे,सखाहरी जाधव, नामदेव कदम,दिनकर भंडारी,सखाहारी दाभाडे, वाल्मीक गुडघे, भाऊसाहेब गुडघे, विजय कदम, ज्ञानदेव आहेर,अरुण लांडे, रामचंद्र उशीर, अरुण काळे, शरद चव्हाण, विक्रम चव्हाण, ज्ञानेश्वर निघुट, शिवाजी मुंगसे, शोभा मेहकर,राजेंद्र जेजुरकर, नितीन निकम, विलास चव्हाण,भीमा जेजुरकर, भाऊसाहेब क्षीरसागर,पोपट गायकवाड,सूर्यभान गायकवाड,कैलास चव्हाण, संजय वरपे, राधाकिसन भागवत, सकाहरी जाधव,परसराम आराखडे,भाऊसाहेब खुरसणे, विजय क्षीरसागर,अरविंद जगधने,बबन चव्हाण , साईनाथ चव्हाण, भास्कर लासुरे, एंडईत, मंगेश आदमने, जगन्नाथ भोसले, शांताराम तुपे, बाबासाहेब तुपे, शंकर पवार, हरिशचंद्र देवरे

"बाजार समितीने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे.हा प्रकार घडल्यानंतर बाजार समितीने संबंधित कांदा व्यापारी राजेन्द्र धूमाळ व दत्तात्रय पैठनकर या दोघांना नोटिसा बजविल्या आहेत.१ एप्रिल नंतर लीलावतही या दोघांना बोली बोलन्यास बंदी घालन्यात आली आहे.व्यापाऱ्यांना बोलावून शेतकार्याचे पैसे देण्यास सांगण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
- उषाताई शिंदे ,सभापती ,बाजार समिति,येवला

"तीन-चार महिने होत आले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने आमरण उपोषनाची वेळ आली आहे.सर्वसामान्य शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक खच्चीकरण झाले असून 
शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व शेतकरी संघटना आहेत.म्हणून इतर कुठल्याही आश्वासन,पत्र यावर उपोषण मागे घेण्यात येणार नाही.
- भागवत सोनवणे

Web Title: please give us selling money of our crops said by farmers