गुरुजी देता का गुरुजी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नांदगाव : अगोदरपासूनच रिक्त असलेल्या तालुक्यातील शिक्षण विभागातल्या प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा अनुशेष शिल्लक राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यात नव्याने भर पडून हा आकडा सव्वाशेपर्यंत जाऊन पोहचला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या या प्रक्रियेत तालुक्याच्या दहा शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तालुक्यात दोनशे पंधरा प्राथमिक शाळा आहेत अन त्यासाठी गुरुजी मिळत नाही, अशी अवस्था ओढविल्याने त्यामुळे कुणी गुरुजी देता का गुरुजी? अशी वेळ आली आहे. परिणामी पालकांकडून शाळांना कुलुपे लावण्याचा शिरस्ता यंदा देखील कायम राहण्याची दाट शक्यता आहे बदल्यांच्या या प्रक्रियेत दहा शाळांना शून्य शिक्षक अशी भीषणता निर्माण झाली. त्यात माळेगाव कार्यात मधील विजयवाडी, गिरणानगर, जामदरी तांडा साकोरा येथील शिवमळा, जातेगावचे वसंतनगर, मांडवाडची इनामवस्ती आटकाट तांडा चिंचविहीरची तुरकुणे वस्ती, कासारी येथील बोरतळावस्ती, जातेगावच्या पिनाकेश्वरवस्ती अशा या दहा शाळांना प्रत्येकी दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र जिल्हा बदली प्रक्रियेत या शाळांना अद्यापही शिक्षक उपलब्ध झालेला नाही या द्विशिक्षकीय शाळा आहेत.

एकट्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षक रिक्त राहण्याची वेळ नांदगाव तालुक्यावर यंदाही कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साठहून अधिक शिक्षकांची कमतरता तालुक्याला भासत आहेत. 

नांदगाव तालुका दृष्टिक्षेपात 
शाळांची संख्या २१५ मंजूर शिक्षकांची पदे ६३० अगोदरची रिक्त पदे ६० 
आंतर जिल्हा बदली १३० शिक्षकांची तालुकाबाहेर बदली 
उर्वरित बदली न झालेल्या मात्र तालुक्यात राहिलेल्या शिक्षकांचीसंख्या ८० 
नव्याने बदलून आलेल्या शिक्षणाची संख्या ६७ 
एवढे करून हि १२७ प्राथमिक शिक्षणाची पदे राहिलीत रिक्त 

Web Title: please provide teachers