पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले 

पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले 

जळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. 

शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थी हिमांशू महेंद्र हिंगोणेकर (वय 20, रा. देवेंद्रनगर) याने एका पोलिसांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले. 21 जानेवारीला ते शहरातून बेपत्ता झाले होते. याबाबत पोलिसात हरविल्याची नोंद आहे. या काळात हिमांशूने तिला दिल्ली, कोल्हापूर, तुळजापूर, मुंबई यासह आदी ठिकाणी नेले होते. जाताना हिमांशूकडे सुमारे 60 हजार रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

रावेरला हिमांशू व ती मुलगी मावशीकडे आल्याची माहिती रामानंद पोलिसांना मिळाली. त्या दोघांना तेथून रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. हिमांशूला जिल्हा रुग्णालयात आणले होते. याप्रकरणी रामानंद पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल आलेला नव्हता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com