पोलिस वसाहतीतील ३२ वृक्ष तोडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

जळगाव - जिल्हा पोलिस मुख्यालय परिसरात कर्मचाऱ्याची जुनी निवासस्थाने पाडून तेथे नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत. या बांधकामासाठी अडथळा ठरणारे ३२ वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. तसेच अमृत योजनेंतर्गत जलकुंभ तयार करण्याच्या बांधकासाठी अडथळा ठरणारे वृक्ष तोडले जाणार आहेत. 

महापालिकेची वृक्ष प्राधिकरणाची बैठक आज उपायुक्तांच्या दालनात झाली. बैठकीत शहर अभियंता डी. बी. दाभाडे, सदस्य नितीन बरडे, अजय पाटील, अमर जैन, पर्यावरण विभागाचे अभियंता योगेश वाणी,  प्रभाग अधिकारी संजय पाटील, संजय नेमाडे, सुशील साळुंखे, विलास सोनवणी आदी उपस्थित होते. बैठकीत ५२ प्रस्तावांपैकी ६ वृक्षतोडीचे प्रस्ताव तर उर्वरित प्रस्तावात फांद्या तोडण्याची परवानगी देण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी ‘महावितरण’तर्फे वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी बैठकीत दिली. इतर धोकादायक असलेल्या फांद्या तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

जलकुंभासाठी झाडे तोडणार
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यात सात ठिकाणी नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. जलकुंभ बांधताना अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

परवानगीची गरज नाही 
शहरात अनेक ठिकाणी गटारींची कामे सुरू आहेत. ही कामे करताना अनेक ठिकाणी वृक्षांचा अडथळा ठरणार आहेत. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. परवानगीसाठी जास्त कालावधी लागत असल्याने याला परवानगी न घेण्याची मान्यता दिली. तसेच दुभाजकामधील वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

Web Title: police colony 32 tree cutting