राष्ट्रवादीच्या 42 कार्यकर्त्यांना 23 मे पर्यंत पोलिस कोठडी :दुहेरी हत्याकांड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नगर, ता. 21 : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांच्या 42 संशयीत आरोपींना 23 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले. 

तोडफोडीच्या गुन्ह्यातील 25 आरोपी आज सकाळी भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जवळपास 42 संशयीत आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यात नगरसेवक आरिफ शेख, कुमार वाकळे, संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक समद खान आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांना दुपारनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. 

सात मे  घडलेल्या या घटनेप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कलम 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) लावण्यात आले होते. तथापि, अलिकडेच तपासाअंती गुन्ह्यातील हे कलम वगळण्यात आले. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या वेळी जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. तसेच जगताप यांना पोलिसांसमोरून उचलून नेले. त्याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांच्यासह 300 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 

Web Title: Police custody of 42 NCP workers till May 23: Double murder