विनय फडणीसांच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

नाशिक - गुंतवणूकदारांची साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस ग्रुपचे मालक विनय फडणीस यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आज चार दिवसांनी वाढ केली. यापूर्वी त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. फडणीस यांना दुपारी जिल्हा न्यायालयात आणले असता सुमारे पाचशेच्या वर गुंतवणूकदारांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.

फडणीस ग्रुप अँड कंपनीज आणि फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपन्यांनी सुमारे चारशेवर गुंतवणूकदारांची साठ कोटी रुपयांवर आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. अजूनही तक्रारींचा ओघ मुंबई नाका पोलिस ठाण्यात सुरू आहे. आरोपींमध्ये अनुराधा विनय फडणीस, शरयू विनय फडणीस यांचाही समावेश आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये नाशिकसह मुंबई, पुणे येथील गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

न्यायालयाने फडणीस यांच्या पोलिस कोठडीत दोन मेपर्यंत वाढ केली. अन्य पाच आरोपी फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: police custody growth in vinay fadnis