मोटारीच्या धडकेत पोलिस ठार

दिगांबर पाटोळे
मंगळवार, 22 मे 2018

वणी-नाशिक रस्त्यावर कृष्णगांव शिवारात मोटीरीने दुचाकीस धडक दिल्याने पोलिस हवालदार ठार झाले.आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हवालदार बाळु माधव मोरे, वय ५२, रा. पिंपळगाव बसवंत हे वणी पोलिस ठाण्यातून आपल्या दुचाकीवरुन दिंडोरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी जात असतांना कृष्णगांव शिवारात एका मोटारीने विरुद्ध बाजूने येवून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये श्री. मोरे यांच्या डोक्यास, हातपायांना गंभीर दुखापत झाली.
 

वणी(नाशिक) - वणी-नाशिक रस्त्यावर कृष्णगांव शिवारात मोटीरीने दुचाकीस धडक दिल्याने पोलिस हवालदार ठार झाले.आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हवालदार बाळु माधव मोरे, वय ५२, रा. पिंपळगाव बसवंत हे वणी पोलिस ठाण्यातून आपल्या दुचाकीवरुन दिंडोरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी जात असतांना कृष्णगांव शिवारात एका मोटारीने विरुद्ध बाजूने येवून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये श्री. मोरे यांच्या डोक्यास, हातपायांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मोटार चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे हे दोन वर्षांपासून वणी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कामकाजासाठी दिंडोरी न्यायालयात कार्यरत होते. येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पोलिस व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मोरे यांच्यावर दुपारी पिंपळगाव येथे शासकिय इतिमामात अत्यंविधी करण्यात आला.
 

Web Title: police die in car accident