धुळे, साक्री तालुक्यातील 198 पोलिस पाटलांना नियुक्ती पत्र

dhule
dhule

देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.  

प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले. धुळे व साक्री तालुक्यातील पोलिस पाटील पदाच्या रिक्त पदांची जागांसाठी दोन महिन्यापूर्वी प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी स्वतः लक्ष घालून पारदर्शक पणे प्रक्रियाा राबवली आहे. लेखी व तोंडी परिक्षेत उत्तीर्ण उमेदवााारांची निवड घोषित करण्यात आली होती. मात्र काही गावातून या भरतीबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. तक्रारी आल्या होत्या.  विशेषतः उमेदवार त्याच गावातील रहिवासी नसल्याचे उघडकीस आले. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मंडळाधिकारी व तलाठ्यांनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष पत्यावर जाऊन तपासणी करण्यात आली. त्यानुसार प्रातांधिकारी श्री.मिसाळ यांनी आठ पोलिस पाटील अपात्र ठरविले. उर्वरीत 198 पोलिस पाटलांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरीत 24 गावांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नऊ गावांतून तक्रार प्राप्त झाल्यामुळे या गावातील उमेदवारांचे नियुक्ती आदेश राखून ठेवले आहेत. 

या पोलिस पाटलांमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मदत होणार आहे. तसेच टंचाईच्या परिस्थितीत प्रशासनास मदत होईल. 

"नवीनच निवड झालेल्या 198 पोलिस पाटील यांना दिवाळीपूर्वीच नियुक्ती आदेश प्रत्यक्ष समक्ष प्रांत कार्यालयातून हाती देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना दिवाळी आनंदाची एक भेटच मिळाली आहे. उर्वरित 24 गावांची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर तक्रारीचे चौकशीसाठी आणखी 9 गावांचे आदेश राखून ठेवले आहेत.
- गणेश मिसाळ प्रांताधिकारी धुळे. 

अ.क्र.    तालुका    पोलीस स्टेशन    नियुक्ती आदेश संख्या

1    धुळे तालुका           54

2    पश्चिम देवपूर           04

3    मोहाडी                   02

4    सोनगीर                   19

5    साक्री                   36

6    निजामपूर                  41

7    पिंपळनेर                  42

एकुण                 198 

अटी अशा...
पाच वर्षाच्या मुदतीसाठी ही नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवाराने दिलेली माहिती व कागदपत्रे चुकीची असल्यास संबंधित उमेदवाराची नेमणूक तात्काळ रद्द करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था कामा व्यतिरिक्त प्रातांधिकारी यांनी नेमून दिलेली कामे निवडणूक, टंचाई, जनगणना व तदनुषगींक सोपविलेली कामे पार पाडणे बंधनकारक आहे. मूळ गावी राहणे अनिवार्य आहे. अशोभनीय, गैरवर्तणूक केल्यास नेमणूक तात्काळ रद्द करण्यात येईल. सहा महिन्याच्या आत  जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com