मेहुणबारे पोलिसांकडून चोरीच्या आठ वाहने जप्त

दीपक कच्छवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मेहुणबारे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव) येथील तरूणाकडे गाडीची कागदपत्रे नसल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दुचाक्या चोरून विकल्याचे कबुल केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने त्याच्याकडून आठ मोटरसायकली जप्त केल्या. 

मेहुणबारे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव) येथील तरूण कैलास राजाराम तिरमली याला नाकाबंदीदरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी रविवार( ता.2 रोजी) मोटरसायकलच्या कागदपत्रे तपासणी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याने त्याला चौकशीकरीता ताब्यात घेतले होते. सखोल चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने दुचाक्या चोरल्याची व  विकल्याची कबुली दिली. त्याच्याजवळील 4 आणि विक्री केलेल्या 4 अशा 3 लाख 20 हजार रूपये किमतीच्या 8 दुचाकी काढून दिल्या आहेत. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शेख, भटू पाटील, गोरख चकोर, दीपक पाटील, सिद्धांत सिसोदे आदींनी सदरची कारवाई केली.

Web Title: Police seized eight vehicles stolen from Mehunbare