पोलिसांकडून मशिन अन्‌ मोबाईल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्राच्या 200 फुटांबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांकडून डिजिटल मशिनमधून मतदारांना स्लिपा दिले जाणारे यंत्र पोलिसांनी जप्त केले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कार्यकर्ते मतदारांचे नाव शोधण्यासाठी मोबाईलचा वापर करताना दिसत होते, अशा मोबाईलवरून मतदारांना भुलविण्याचाही प्रयत्न होण्याची शक्‍यता गृहित धरून पोलिसांनी 35 मोबाईलसह दोन लॅपटॉप जप्त केले. 

मतदान केंद्राच्या 200 फुटांबाहेर असलेल्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना त्यांची नावे शोधून देण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न केले जात होते. पारंपरिक पद्धतीने मतदारांच्या याद्या आणि त्यानुसार स्लिपाही दिल्या जात होत्या. बहुतांश ठिकाणी लॅपटॉपचा वापर केला जात होता. मात्र, त्याचवेळी काही कार्यकर्त्यांकडे डिजिटल मशिनही होते. 

परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सकाळी काही मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर त्यांना मशिन नजरेस पडले. त्यांनी उत्सुकतेपोटी त्या मशिनची पाहणी केल्यानंतर त्यातून मिळणारी स्लिप पाहून त्यांनी तातडीने असे तीन मशिन जप्त केले. परिमंडल एकमध्येही पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दहा मशिन जप्त केले. असे एकूण शहर परिसरातून 13 मशिन पोलिसांनी जप्त केले. 

मतदान केंद्रांना पोलिस आयुक्तांच्या भेटी 
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. नाशिक रोड, उपनगर, जुने नाशिक, मध्य नाशिकसह पंचवटी, सिडको, सातपूर परिसरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथे पाहणी केली. बी. डी. भालेकर शाळेत शेवटच्या तासाभरात गर्दी झाल्याचे समजताच त्याठिकाणी तातडीने भेट दिली. 

Web Title: Police seized machine and mobile