भारत बचाओ महारथयात्रेला पोलिसांचा ब्रेक !

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पिलखोड(ता. चाळीसगाव) : भारत बचाओ महारथयात्रेला मालेगाव शहारात जाण्यास परवानगी नसल्याने ही रथयात्रा गुरुवारी(ता. 5) दुपारी चारच्या सुमारास साकुर फाट्याजवळ पोलिसांनी अडवली. यामुळे सुमारे अडीच तास वाहनांचा चक्काजाम झाला. त्यानंतर रथयात्रेचे पदाधिकारी आणी पोलिसांनी तडजोड करत चाळीसगाव फाट्याकडून रथयात्रा धुळ्याकडे रवाना करण्याचे ठरवले.

लोकसंख्या नियंत्रण कायदा व्हावा यासाठी कश्मीर ते कन्याकुमारी ते दिल्ली अशी 'भारत बचाओ' महारथयात्रा निघाली आहे. राष्ट्र निर्माण संघटनेचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. ही रथयात्रा चाळीगावहून मालेगावकडे जातांना साकुर फाट्याजवळ गुरुवारी(ता. 5) दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी अडवली. या रथयात्रेला मालेगाव शहरात जाण्यास परवानगी नसल्या कारणाने मालेगावसह चाळीसगाव पोलिसांनी रथयात्रेला अडवुन ठेवले होते. यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला. 

रास्तारोको झाल्याने सुमारे अडीच तास वाहतुकीचा पुर्णपणे खोळंबा झाला. अखेर राष्ट्र निर्माण संघटनेचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके आणि पोलिसांनी तडजोड करुन रथयात्रा चाळीसगाव फाट्याकडून  धुळ्याकडे रवाना करण्याचे ठरले. रथायात्रा मार्गस्थ झाल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली. अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. 

तुम्ही हे वाचलं का?

राज्यात वादळी पावसाची शक्यता

पेट्रोलची 2 वर्षांत 19 रुपये दरवाढ​

Web Title: police stops bharat bachao mahayatra near pilkhod