पोलिसांनी केला गावठी दारुचा अड्डा उध्वस्त

गोपाळ शिंदे
बुधवार, 25 एप्रिल 2018

घोटी (नाशिक) : खेड भैरवनाथ येथील ग्रामपंचायत हद्दीतील देवाचीवाडी येथील गावठी दारू अड्ड्यावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे ,यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ( ता. २५ ) रोजी सकाळी ७ ते ११ वाजे दरम्यान छापा टाकण्यात आला. या छाप्यात लाखो रुपये किमतीचे साहित्य नष्ट करण्यात आले. 

विशेष गोपनीय अधिकारी यांच्या गोपनीय खबरी नुसार घोटी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरिक्षक पंकज भालेराव यांनी धाडसी पोलिसांचे पथक नेमत येथील दुर्गम घनदाट जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकत तब्बल २८ ड्रम विषारी रसायन मिश्रण असलेले प्रति ली.५० प्रमाणे एकूण २ लाख ८०,०००रुपये किमतीचे विषारी रसायनासह ५० हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड ५६००रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम आदीसह मुद्देमाल साधनसामुग्री नष्ट करण्यात आली.  

दरम्यान, पोलीसांची चाहूल लागताच अज्ञात इसम घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यास यशस्वी झाले आहे, याबाबत सबंधित इसमांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सकाळशी बोलतांना  दिली. 

घनदाट जंगल परिसर असल्याने गावठी दारू अड्ड्यावरील इसमांकडून पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना ताज्या असल्याने हा छापा टाकण्याकामी टाकणे कामी ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडील स्ट्रायकिंग फोर्सचे तेरा कर्मचारी यांसह घोटी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस उपनिरीक्षक अधिकारी व अकरा पोलीस कर्मचारी यांनी धाडसी छापा टाकत मुद्देमाल नष्ट केला.

घोटी पोलिसांच्या अनेक धाडसी छाप्यानी हातभट्टी विषारी दारू बनविणाऱ्या इसमांचे धाबे दणाणले असून परिसरात असे गावठी दारू अडळल्यास त्वरित घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहान साह्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना केले आहे. 

यावेळी, घोटी पोलीस ठाण्याचे साह्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस उपनिरीक्षक आंनदा माळी, पोह.बिपीन जगताप,रविराज जगताप,पोलीस नाईक विश्वास पाटील, भास्कर शेळके, संतोष दोंदे, गायकवाड,शितल गायकवाड, लहू सानप, प्रकाश कासार, रमेश  चव्हाण, शरद कोठुळे, शैलेश शेलार ग्रामीण पोलीस पोलीस मुख्यालयाकडील स्ट्रायकिंग फोर्सचे तेरा कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police take action against illegal liquor factories