पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नाशिक - लहवितला आदिवासी महिलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतरही देवळाली कॅम्प पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. 17) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लहवित (ता. नाशिक) येथे काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दोन आदिवासी महिला शौचालयाला गेल्या असताना गावातील दोघांनी दारूच्या नशेत संबंधित महिलांवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्या विरोधात महिलांच्या कुटुंबीयांनी देवळाली कॅम्प पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दखल घेण्याऐवजी महिलांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल केले.

अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न म्हणजे अत्याचार असून, त्याची चौकशी करावी ही मागणी करीत आंदोलक महिलांसह आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: police tribal development council march