सत्तेच्या डावपेचात पोलिसांच्या सुट्या मात्र रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

दोन दिवसांत महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. त्यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषाची तयारी केली जात होती. अशातच शनिवारचा दिवस राज्याच्या सत्तेत भूकंप आणणारा ठरला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. शनिवारी वाऱ्यासारखी ही बातमी प्रसारित होताच पोलिस विभागाची चांगलीच तारांबळ उडाळी.

नाशिक : सत्तेच्या डावपेचात पोलिसांची प्रचंड हेडळसांड होत आहे. सकाळी अचानक अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे पोलिस विभागाची एकच धावपळ उडाळी. पक्ष कार्यालयांसह चौकाचौकांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवाय पोलिस संख्याबळ बघता कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून आले. 

अनपेक्षित घटनांमुळे अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात 

दोन दिवसांत महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. त्यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषाची तयारी केली जात होती. अशातच शनिवारचा दिवस राज्याच्या सत्तेत भूकंप आणणारा ठरला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. शनिवारी वाऱ्यासारखी ही बातमी प्रसारित होताच पोलिस विभागाची चांगलीच तारांबळ उडाळी.

Image may contain: 4 people, people standing

संवेदनशील भागात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शहरात कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी सर्वप्रथम पोलिस आयुक्तालय तसेच भद्रकाली पोलिसांकडून भाजप आणि शिवसेना पक्ष कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर जुने नाशिकसह शहरातील विविध संवेदनशील भागातील चौकाचौकांत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी आहे किंवा जे कर्मचारी किरकोळ रजेवर गेले आहेत, त्यांच्या सुट्या रद्द करत त्यांना तत्काळ पोलिस मुख्यालय, तसेच त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अचानक सुटी रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन फोल ठरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पोलिस ठाण्यात हजेरी तर लावली; परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी दिसली. शनिवार आणि रविवार दोन दिवसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police vacations canceled due to Political crisis Nashik Marathi News