वरखेडे-लोंढे बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त 

दीपक कच्छवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

मेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. या कामावर आता किती दिवस पोलिस बंदोबस्त राहतो, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

मेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. या कामावर आता किती दिवस पोलिस बंदोबस्त राहतो, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पावर 27 नोव्हेंबरला तामसवाडी येथील ग्रामस्थांसह महिलांनी ठिय्या आंदोलन केले होते. जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा इशारा देत त्यावेळी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. तेव्हापासून जवळपास 37 दिवस काम बंद होते. त्यामुळे जिल्हास्तरावरून हे काम सुरु करण्याचे आदेश झाल्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करुन काम पूर्ववत सुरु करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

58 कर्मचारी तैनात 
बॅरेज प्रकल्पाच्या उजव्या बाजूचे काम सध्या सुरू आहे. गिरणा नदीपात्रात खोदकाम करण्यास आजपासून सुरवात झाली. यावेळी तामसवाडीच्या ग्रामस्थांचा होणारा विरोध लक्षात घेता, पोलिस अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षक दलाच्या महिलांसह 58 जणांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी बॅरेजवर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बंदोबस्तासंदर्भात पाहणी करुन कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. प्रकल्पाचे काम रात्र पाळीतही सुरु राहणार असल्याने पोलिसांचा रात्रंदिवस पहारा या ठिकाणी राहणार आहे. पोलिस बंदोबस्तात काम होणारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याचे दिसून येत आहे. 

तामसवाडी गावाचे पुनर्वसन 
या बॅरेजच्या कामाला गती मिळाली यासाठी संबंधित यंत्रणा जोमाने कामाला लागली होती. या कामामुळे तामसवाडी गावातील काही जणांची घरे जाणार आहेत. त्यामुळे आमचे पुनवर्सन करावे अशा मागणीचे निवेदन 22 जून, 15 सप्टेंबर व 22 नोव्हेंबरला प्रांताधिकारी तसेच सिंचन विभागाला दिले होते. यापूर्वी तामसवाडी गावाचा सर्व्हेक्षणात समावेश नव्हता. नंतर मात्र हे गाव 61 टक्के बुडणार असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे तेव्हापासून तामसवाडीचे ग्रामस्थ प्रचंड तणावात असून त्यांनी संपूर्ण गाव प्रकल्प बाधीत होणार असल्याने पुनर्वसनाची मागणी केली आहे. 

दरम्यान, बॅरेजचे पाणी अडविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या गेटच्या अगोदर तामसवाडीच्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बॅरेज प्रकल्पावरील कामावर कोणीही अडथळा आणू नये, यासाठी आम्ही पोलिस बंदोबस्तात काम सुरु केली आहे. अडथळा निर्माण झाला नाही तर पोलिस बंदोबस्त काढण्यात येईल. 
- प्रशांत मोरे, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम लघु प्रकल्प (2), जळगाव. 

Web Title: police at the Warkhade-Londhe barrage