चाळीसगाव: महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

अनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते.

चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले. ही घटना आज सकाळी 9.30 वाजता कन्नड घाटाखाली महामार्ग पोलिस चौकीजवळ पडली.

अनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकने अनिल शिशोदे यांना चिरडले या ते जागीच ठार झाले.

या घटनेप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.

Web Title: policeman killed in accident at chalisgaon