राजकारणातील प्रतिष्ठितांची "प्रतिष्ठा' पणाला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत असताना या निवडणुकीत शहरातील माजी महापौर, राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्तींची "प्रतिष्ठा' पणाला लागली आहे. मुलगा, मुलगी व कुटुंबातील अन्य सदस्यांना निवडून आणण्यासाठी अनेकांची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात स्थान भक्कम करण्यासाठी काही आजी-माजी नगरसेवक व महापालिकेचे पदाधिकारी प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 

महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी महापौर ऍड. यतीन वाघ, माजी उपमहापौर अजय बोरस्ते व सतीश कुलकर्णी, संभाजी मोरुस्कर, शशिकांत जाधव, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, माजी सभापती उद्धव निमसे हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सलीम शेख यांच्याबरोबरच पत्नी फरिदा शेख प्रथमच निवडणूक लढवत आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. तानाजी जायभावे हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याबरोबर भगिनी ऍड. वसुधा कराड निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह पुत्र अमोल निवडणूक लढवत आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती शाहू खैरे यांच्यासह त्यांच्या वहिनी वत्सला खैरे, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्याबरोबरच पत्नी हर्षा बडगुजर, विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण व कन्या डॉ. स्नेहल चव्हाण निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी उल्हास धनवटे यांच्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. 

यांच्यासाठी हे निवडून येणे महत्त्वाचे 
माजी महापौर वसंत गिते यांच्यासाठी पुत्र प्रथमेश. 
माजी महापौर अशोक दिवे यांच्यासाठी पुत्र राहुल व प्रशांत. 
माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासाठी पुत्र प्रेम. 
माजी महापौर विनायक पांडे यांच्यासाठी वहिनी कल्पना पांडे. 
आमदार बाळासाहेब सानप यांच्यासाठी पुत्र मच्छिंद्र. 
आमदार सीमा हिरे यांच्यासाठी दीर योगेश. 
आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासाठी भगिनी हिमगौरी आडके. 
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासाठी कन्या नयना व तनुजा. 
माजी आमदार नितीन भोसले यांच्यासाठी काकू सुरेखा भोसले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना महाले यांच्यासाठी पुत्र अमोल व पुतणे राजेंद्र महाले, कन्या अर्चना टाकेकर. 
श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल यांच्यासाठी आई भिकूबाई बागूल.

Web Title: political establishment