लोकसभेच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ; अश्लील चाळ्यांची क्लीप व्हायरल

लोकसभेच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ; अश्लील चाळ्यांची क्लीप व्हायरल

जळगाव - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या महिलेसोबतच्या अश्‍लील चाळ्यांची चित्रफीत व छायाचित्रे अचानक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या क्‍लीपमधील चित्रण सत्य की, मॉर्फ केलेले, याबाबतही शंका व्यक्त होत असून, येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा बनणार, हे मात्र दिसत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासूनच संबंधित लोकप्रतिनिधीच्या महिलेसोबत केलेल्या चाळ्यांच्या चित्रफितीची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू होती. विविध पक्षांतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी अशाप्रकारची क्‍लीप असल्याचा दावाही केला होता. मात्र, ती क्‍लीप कुणी ‘व्हायरल’ केली नव्हती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा काढू, असाही काहींचा प्रयत्न होता आणि नेमका तोच ‘टायमिंग’ साधला गेला आहे. आज दिवसभर व्हॉटस्‌ॲपच्या ग्रुपवरून या लोकप्रतिनिधीच्या चाळ्यांच्या क्‍लीपचे वृत्त व्हायरल झाले. काही ग्रुपवर तर छायाचित्रेही व्हायरल झाली. त्यात लोकप्रतिनिधी स्पष्ट दिसत असून, त्याच्यासोबत महिलाही आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

विरोधकांची सावध भूमिका
गेल्या काही महिन्यांपासून या क्‍लीपबद्दल राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. आज दिवसभरात क्‍लीप व छायाचित्रे ‘व्हायरल’ होऊन वृत्तही सोशल मीडियावर झळकले. मात्र, विरोधी पक्ष अथवा या लोकप्रतिनिधीच्या स्पर्धकांमधून अद्याप याबाबत कुणी बोलायला पुढे आलेले नाही. या प्रकरणी त्यांची सावध भूमिका असल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com