खडकी बुद्रूक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

संजय ब्राम्हणकर
रविवार, 3 जून 2018

खडकी बुद्रुक (ता. चाळीसगांव)  येथील ग्रामस्थांनी गुजरात अंबुजा कंपनीच्या गेल्या दोन महिन्यांपासून येणाऱ्या दुर्गंधीचा वास बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी  निवेदन दिले.या  कंपनीत मक्यावर प्रक्रिया करून त्यापासून स्टार्च पावडर बनवली जाते.

खडकी बुद्रूक (ता.चाळीसगाव) : खडकी बुद्रूक येथे असलेल्या गुजरात अंबुजा कंपनीच्या मक्का प्रक्रियेमुळे परिसरात मोठी दुर्गंधी येते. जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार मागणी करून देखील कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून यात दुर्गंधीचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

खडकी बुद्रुक (ता. चाळीसगांव)  येथील ग्रामस्थांनी गुजरात अंबुजा कंपनीच्या गेल्या दोन महिन्यांपासून येणाऱ्या दुर्गंधीचा वास बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी  निवेदन दिले.या  कंपनीत मक्यावर प्रक्रिया करून त्यापासून स्टार्च पावडर बनवली जाते. मका पाण्यात  भिजविला जातो त्या वेळी त्याच्यातून विशिष्ट प्रकारचा वायू तयार होतो. मका भिजवलेले ते पाणी कंपनीच्या आवारातील गावाकडच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या तलावात सोडले जाते. त्यापासून येणाऱ्या घाण दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

लहान बालकांना श्वसनाचे विकारांचा त्रास जडला आहे. आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील पाणी सुध्दा दूषित होत आहे.या घाण दुर्गंधी वासामुळे ग्रामस्थांना गावात राहणे त्रासदायक झाले आहे. कंपनी व्यवस्थापकाने आठ दिवसात दुर्गंधी वासाचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थ कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.मनाजी तांबे,सुजित गायकवाड, गोकुळ कोल्हे,नाना तांबे,विनायक मांडोळे,बापु मांडोळे,कैलास कोल्हे,रमेश तांबे व ग्रामस्थांनी निवेदन दिले.

Web Title: pollution in khadki budruk chalisgaon