अमेरिकेत यंदाही पाठवले जाणार डाळिंब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

युरोपसाठी दीडशे रुपयांचा भाव
राज्यात डाळिंबाखालील क्षेत्र 2 लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. तेलकट डागाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी यंदा बहार उशिरा धरला. त्यातच हवामान पूरक राहिल्याने तेलकट डागाची समस्या कमी प्रमाणात भेडसावली. त्याचवेळी युरोपामधील निर्यातीसाठी रासायनिक औषधांचा उर्वरित अंश नसलेल्या डाळिंबाला मोठी मागणी राहिली.150 रुपये किलो भाव मिळाला

नाशिक - अमेरिकेत गेल्यावर्षी डाळिंब पाठवण्यात आले होते. त्यास अपेक्षित भाव न मिळाल्याने निर्यात तोट्यात राहिली. पण अमेरिकेची बाजारपेठ मिळविण्यासाठी यंदा पुन्हा डाळिंब पाठवण्यात येणार आहेत. आरोग्याच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या ग्राहकांसाठी पूर्वी गरम पाण्यात उकळून डाळिंबामधील कीड मारण्याचा प्रयोग केला होता. आता मात्र मुंबईमध्ये किरणोत्सर्जनाने कीड मारली जाणार आहे.

डाळिंब महासंघाचे नेते प्रभाकर चांदणे यांनी ही माहिती "सकाळ' ला दिली. ते म्हणाले, की आंब्यासोबत डाळिंब अमेरिकेला पाठवण्यात आले होते. मात्र त्यास अपेक्षित भाव मिळाला नाही. हवाईमार्गे डाळिंब पाठविण्यासाठी पणन विभागाने विचारणा केली आहे. त्यानुसार अमेरिकेसाठी सांगोलामधून अर्धाटन डाळिंब उपलब्ध करुन दिले जाणार आहे. किरणोत्सर्जनाने कीड मारण्यासाठी मुंबईतील वाशीमध्ये पणन विभागाने व्यवस्था केली आहे.

युरोपसाठी दीडशे रुपयांचा भाव
राज्यात डाळिंबाखालील क्षेत्र 2 लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. तेलकट डागाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी यंदा बहार उशिरा धरला. त्यातच हवामान पूरक राहिल्याने तेलकट डागाची समस्या कमी प्रमाणात भेडसावली. त्याचवेळी युरोपामधील निर्यातीसाठी रासायनिक औषधांचा उर्वरित अंश नसलेल्या डाळिंबाला मोठी मागणी राहिली.150 रुपये किलो भाव मिळाला.

शेतकऱ्यांना किलोमागे पन्नास रुपये मिळालेत. दोन वर्षांपूर्वी 200, तर गेल्यावर्षी 125 रुपये किलो असा भाव मिळाला होता. यंदा युरोपसाठी चांगला भाव मिळाल्याने पुढील हंगामात निर्यातक्षम डाळिंबाच्या उत्पादनाकडील कल वाढेल, असे चांदणे यांनी म्हटले आहे.

Web Title: Pomegranate sent to USA this year