सकारात्मकतेमुळेच जीवन जगण्याचे बळ मिळते : प्रा. आशाताई उपासनी

भगवान जगदाळे
गुरुवार, 19 जुलै 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : जीवन जगताना सकारात्मकता बाळगल्यास जीवन गाणे सोपे होऊन जगण्यास अधिक बळ मिळते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. आशाताई बिंधुमाधव उपासनी (मुंबई) यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नित्यानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त आज (ता.१९) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या उषाताई वेणीमाधव उपासनी (मुंबई) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

व्यासपीठावर संस्थेचे संचालक विठ्ठलराय उपासनी, सचिव नितीन शाह, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक सुरेश माळी, शिक्षक प्रवीण शाह, शोभा उपाध्ये आदी उपस्थित होते. शाळेत दरवर्षी आषाढ शुद्ध सप्तमीला नित्यानंद महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी केली जाते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भागवतकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. संस्थेचे दिवंगत संचालक राजेश्वरबुवा उपासनी यांचे ते वडील असून त्यांनी निजामपूरला रोहिणी नदीतिरी गोपाळपुरा येथे जिवंतपणी समाधी घेतली आहे.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. संस्थेचे संचालक विठ्ठलराय उपासनी, शिक्षक प्रवीण शाह यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना विठ्ठलराय उपासनी म्हणाले की, आनंदाने जीवन जगणे ही एक कला असून भूतकाळाची चिंता व भविष्याचे चिंतन करण्यापेक्षा प्रत्येकाने वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. परिस्थिती कशीही असली तरी नित्य आनंदात राहणाऱ्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळालेला असतो असेही ते म्हणाले. शिक्षक प्रवीण शाह यांनी नित्यानंद स्वामींच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. शिक्षक सत्यनारायण शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. देविदास पाडवी यांनी आभार मानले.

Web Title: positive energy gives power to live life said asha upasani