ऍट्रॉसिटी प्रकरणी चुंभळेच्या अटकेची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीनंतर सभापती शिवाजी चुंभळे यांनी संचालक रवींद्र भोये यांना जातिवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याच संदर्भात सोमवारी शिवाजी चुंभळे यांच्या वकिलाने दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला. त्यामुळे न्यायालयासमोर ठेवलेला जामीन अर्ज मागे घेतल्याने त्यांच्यासमोर पोलिसांना शरण येणे वा अटक होण्याची चर्चा सुरू आहे

नाशिक ; नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकास जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले सभापती शिवाजी चुंभळे यांना अटक होण्याची शक्‍यता आहे. चुंभळे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज सोमवारी (ता. 18) काढून घेतला. तक्रारदाराने चुंभळे यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची विनंती न्यायालयाकडे केली असून, त्यावर येत्या 25 तारखेला सुनावणी होणार आहे. 

जामिनासाठीचा अर्ज....चुंभळेंकडून माघारी 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीनंतर सभापती शिवाजी चुंभळे यांनी संचालक रवींद्र भोये यांना जातिवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याच संदर्भात सोमवारी शिवाजी चुंभळे यांच्या वकिलाने दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला. त्यामुळे न्यायालयासमोर ठेवलेला जामीन अर्ज मागे घेतल्याने त्यांच्यासमोर पोलिसांना शरण येणे वा अटक होण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, तक्रारदार व संचालक रवींद्र भोये यांच्या माहितीनुसार चुंभळे यांनी न्यायालयाचा अवमान केला असून, तक्रारदाराला धमकी दिल्याने जामिनासाठी असलेल्या अटी-शर्तींचा त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे चुंभळे यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची विनंती न्यायालयास केली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले. न्यायालयाने तक्रारदार भोये यांनी केलेल्या विनंती अर्जावर सोमवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. त्यामुळे सभापती चुंभळे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of arrest Shivaji Chumble atrocity case Nashik Marathi News