साकोऱ्यात पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

साकोऱ्यात पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

साकोरा - गेल्या तिन चार वर्षापासून नांदगाव तालूक्यात अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पोल्ट्रीधारकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत आहे. यंदा पाऊसच न झाल्याने विहीरीनी तळ गाठला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

नांदगाव तालूक्यात यंदा पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विहीरीनी तळ गाठल्याने शेती जोडव्यवसाय पोल्ट्री धारकांची भयावह अवस्था झाली आहे. कमीतकमी पाच हजार पक्ष्यांना दिवसागणिक तिन ते साडेतिन हजार लिटर पाणी लागते. बँकेचे कर्ज काढून लाखो रूपये खर्च करून सुशिक्षीत बेरोजगार तरूनांनी पोल्ट्री ऊभे केले पाण्याअभावी  पन्नास टक्के पोल्ट्री  बंद पडले राहिलेले पन्नास टक्के पोल्ट्री  बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

" नांदगाव येवला तालूक्यासाठी आंध्रप्रदेशातून २० ते २५ कंटेनर पोल्ट्रीला खाली टाकण्यासाठी तांदूळाचे तुस येत होते. पाण्याच्या कमतरतेमुळे आज फक्त चार ते पाच कंटेनर तुसाचा खप होत आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याअभावी  पोल्ट्री बंद पडले आहेत. दुष्काळामुळे तुस व्यवसायावर परिणाम झाला आहे."
जनार्दन झाल्टे

तुस सप्लायर मनमाड 
"अत्यअल्प पावसामुळे यंदा विहिरीना पाणीच आले नाही.विहीरी कोरड्याठाक झाल्या आहेत. पाण्याआभावी पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे."
नितीन कदम 

पोल्ट्रीधारक साकोरा ५०००[ पाच हजार ] 
पक्षांसाठी लागणारा  खर्च  ४२ ते ४५ दिवसांसाठी
*  २०० ते २५० क्विंटल खाद्य दर ३००० ते ३५०० रूपये क्विंटल .
* लहान पिल्लाची किंमत ३० ते ३५ रूपये.
* ओषधे १५ ते २० हजार रूपये.
* दिवसाला पाणी लागते सरासरी  दोन ते तिन हजार लिटर.
* ?विजबिल १५०० ते २००० हजार रुपये .
* तुस लागते १२ ते १५ क्विंटल दर ७०० ते ९०० रूपये क्विंटल 
* १५००० हजार रूपये 
माणसाची मजूरी. 
आठ ते नऊ लाख रूपये खर्च येतो

सरासरी एका पक्षाचे वजन २ ते आडिच किलो जाते किलो जाते एकून वजन १०० ते १२००क्विंटल वजन येते बाजार भावानुसार ८० ते ९० रूपये भाव असल्यास आठ ते १० लाख रूपये उत्पन्न होते. दुष्काळी परिस्थिती मुळे खर्च करून शेवटी पाणी कमी पडल्यामुळे पोल्ट्रीधारकांना आस्मानी संकटाना तोंड  द्यावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com