दिंडीतील वारकर्यांसाठी 35 वर्षांपासून पुरण पोळी जेवण देण्याची प्रथा

राजेंद्र बच्छाव 
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक - इंदिरानगर आषाढी एकादशी निमीत्त आळंदी येथून जाणाऱ्या स्व.गोविंदमहाराज केंद्रे यांच्या दींडीतील हजारो वारकर्यांनी आज सासवड, ता.पुरंदर येथे पुरणपोळी (मांडे) आणि अंबारस मेजवानीचा आस्वाद घेतला. सारदे ता.बागलाण येथील महीलांनी हे मांडे पाठवले होते. विशेष म्हणजे गेली ३५ वर्षे द्वादशीला दींडीचे दुपारचे जेवण सासवड येथे आणि त्यासाठीचे मांडे सारदे येथून हे सूत्र अखंड सुरू आहे. यंदा देखील वारी मधील सुमारे पाच हजार वारकर्यांसाठीचे शेकडो मांडे सकाळीच सासवड येथे पोचवण्यात आले होते. 

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यास ४७ दिंड्या नोंदणीकृत आहे. त्यात गोविंद महाराज यांनी सुरू केलेली ही दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठी दिंडी म्हणून प्रचलित आहे. ऐकूण ५ ते ६ हजार वारकरी ह्या दिंडीत सहभागी असतात. गेल्या काही दशकांपासून ही अतिशय नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने पालखी सोहळा चालू आहे. 

पूर्वी या वारीमध्ये गावातील महीला आणि पुरूष सहभागी होत असत. गावात प्रवचनासाठी आले असतांना गोविंद महाराजांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. त्यावेळी त्यांनी असे जेवण वारीत मिळाले तर कीती छान होईल असे सहज सांगितले. त्यानंतर वारीत सहभागी होणाऱ्या महिला खापर आणि पुरणपोळीसाठी लागणारे साहीत्य घेत सहभागी होत असत. मात्र वारकर्यांची संख्या आणि मांडे तयार करणाऱ्या महिला हे सूत्र जमत नव्हते. शेवटी भजनी मंडळाच्या सदस्य गावातच आदल्या रात्री मांडे तयार करायचे. गावातील राममंदीरात जमा करायचे आणि द्वादशीला दुपारच्या जेवणापर्यंत वाहनाद्वारे सासवडला हे मांडे पोचवणे सुरू केले. पिढ्यान पिढ्या ही परंपरा आता सुरू आहे. अख्ख्या गावातील महिला गावाचाच सण म्हणून यात सहभागी होतात. विशेष म्हणजे युवा पिढी देखील आता यात सहभागी होत आहे.

Web Title: The practice of providing food for the welfare of Dindi for 35 years