Dhule News : दिव्यांगांना 5 टक्के निधी तत्काळ वाटप करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

giving a statement to the Panchayat Samiti by Taluka President of Prahar Jan Shakti

Dhule News : दिव्यांगांना 5 टक्के निधी तत्काळ वाटप करा!

शिरपूर (जि. धुळे) : येथील पंचायत समितींतर्गत ११८ ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) उत्पन्नातून दिव्यांगांना राखीव असलेला ५ टक्के निधी यंदाच्या आर्थिक वर्षात ३१ मार्चपूर्वी वाटप करावा,

दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी येथील प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे करण्यात आली. (Prahar Apang Kranti Sanstha demanded to gram panchayat 5 percent of funds reserved for disabled distributed before March 31 dhule news)

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पंचायत समितीमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींना ५० टक्के पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेमध्ये प्राधान्यक्रम द्यावा, ज्या ग्रामपंचायतींनी व्यापारी संकुल बांधले असेल, तेथे दिव्यांगांच्या मागणीनुसार गाळे उपलब्ध करून द्यावेत,

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

दिव्यांग व्यक्तींसाठी संपूर्ण योजनांची माहिती ग्रामपंचायत फलकावर लावण्यात यावी, दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीमध्ये सन्मानाची वागणूक देण्यात यावी, अशा मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, जिल्हा सचिव स्वप्नील जाधव, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुका उपाध्यक्ष विलास पवार, राहुल माळी, माधुरी सोनवणे, मका भरवाड आदींनी निवेदनातून केली.