प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमाला पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

खामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

विद्या परिषदेच्या संशोधन विभागातर्फे राज्यातील प्राथमिक शिक्षकांकरीता दरवर्षी  शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) घेतले जातात. या वर्षी राज्यभरातील  २४२  शोधनिबंधातुन बोरस्तेवस्ती ता निफाड येथील प्रकाश चव्हाण यांच्या "डिजिटल अध्ययन साहित्याच्या साहाय्याने विध्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावणे" या नवोपक्रमाला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रथम पाच व उत्तेजानार्थ पाच शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आली. यावेळी सुनील मगर संचालक विद्यप्राधिकारण पुणे, विकास गरड आय सी टी संचालक, सुजाता लोहकरे, शोभा खंदारे, नेहा बेलसरे, नामदेव शेंडकर उपसंचालक उपस्थित होते. स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशाबद्दल जिल्हा परिषदेचे शिक्षनाधिकारी डॉ वैशाली झनकर, निफाडच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप शिक्षण विस्तार अधिकारी संजय चव्हाण, केंद्रप्रमुख भास्कर बोरसे, उप सरपंच अनिल बोरस्ते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी बोरस्ते यांनी अभिनंदन केले आहे.  

शिक्षण उपसंचालक सुनील मगर यांनी नवोपक्रमशील शिक्षकांचे भरभरून कौतुक करत शिक्षण क्षेत्रात नवोपक्रमशील शिक्षकांचे योगदान अभ्यासक्रम व संशोधन प्रकियेसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढले.

Web Title: Prakash Chavan gets teacher's innovative award