सीबीएसई' दहावीत किमया चौधरी जिल्ह्यात प्रथम 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

सीबीएसई' दहावीत किमया चौधरी जिल्ह्यात प्रथम 

जळगावः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे "सीबीएसई' दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला असून, यात शहरातील ओरिऑन सीबीएसई स्कूलची किमया चौधरी ही 98.80 टक्के गुण मिळवत प्रथम आली, तर आशिष सुनील पाटील हा 98 टक्के गुण मिळवत द्वितीय आला. काशिनाथ पलोड विद्यालयातील आयुष येवले याने (97.80) टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. दरम्यान शहरातील आठही सीबीएससी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून 90 टक्‍क्‍याहून अधिक टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. 

"सीबीएसई' दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होताच अनेकांनी मोबाईलचाच आधार घेत घराघरांत पालकांसमवेत आनंद व्यक्‍त केला. उन्हामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत न येता घरीच एकत्रित येऊन जल्लोष केला. आजकाल सर्वत्र ऍन्ड्रॉइडचा जमाना असल्याने, सायबर कॅफेवर गर्दी नव्हती. मात्र, मोबाईलवर निकाल पाहण्याची उत्सुकता तितकीच होती. आज निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. शाळांचा शंभर टक्के निकाल लागल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुलले होते. 

विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित 
निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत आनंद द्विगुणित केला. दरम्यान, एकमेकांना पेढा देत पालकांनी विद्यार्थ्यांची तोंड गोड केले. यावेळी निकाल पाहून झाल्यानंतर मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी एकमेकांना दूरध्वनी करून भेटण्याचे नियोजन करीत सायंकाळी भेटी घेतल्या.
...........................
 
Web Title: pratham