प्रतिपंढरपूर कोटमगावी दोनशेवर दिंड्या तर लाखभर भाविक विठूचरणी लीन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जया नाही जमणार पंढरी, त्यानं जावे कोटमपुरी..असे म्हणत भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशी निमित आज प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या कोटमगाव येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभरात चार तालुक्यातून आलेल्या 200 च्यावर दिंड्यासह लाखांहून अधिक भाविक विठल-रुखुमाईच्या चरणी लीन झाले.
 

येवला: जया नाही जमणार पंढरी, त्यानं जावे कोटमपुरी..असे म्हणत भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशी निमित आज प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या कोटमगाव येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभरात चार तालुक्यातून आलेल्या 200 च्यावर दिंड्यासह लाखांहून अधिक भाविक विठल-रुखुमाईच्या चरणी लीन झाले.

कोटमगाव येथिल विठ्ठल मंदिरात आज पहाटे पाच वाजता आमदार पंकज भुजबळ व पंचायत समितीच्या सभापती नम्रता जगताप, विजय जगताप यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटेपासूनच दिवसभर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर, आषाढी- कार्तिकी विसरू नका, मज सांगतसे गुज पांडुरंगा, विठ्ठल आवडी प्रेमभाव, जय जय विठोबा-रखुमाई अशा सुरेल अभंगांच्या निनादाने हलक्या स्वरुपात दिवसभर संततधार सुरु असतांना रात्रीपर्यंत भक्तांच्या गर्दीचा महापूर येथे होता.

कोपरगाव, वैजापूर नांदगावसह येवला शहर, पाटोदा, राजापूर, अंदरसूल, पुरणगाव, ठाणगाव, अंगणगाव, मुखेड व परिसरातून 200 च्यावर दिंड्या दिवसभरात येथे आल्या तर सुमारे 15 दिंड्या मुक्कामी होत्या.

Web Title: at pratipandharpur komatgoan 200 dindi