गर्भवतींच्या समतोल आहाराकडे दुर्लक्ष

प्रशांत कोतकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे येते व पुढील त्रासांना बाळासकट कुटुंबीयांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक - आईच्या गर्भात बाळाची वाढ होणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती असतानाच आईचा आहार समतोल असणे अत्यावश्‍यक आहे. नेमके राज्यात याबाबत काळजी घेतली जात नसल्याने जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे येते व पुढील त्रासांना बाळासकट कुटुंबीयांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. 

राज्यात शासनाकडून माता-बालसंगोपन अभियान राबविण्यात येते. त्याचा परिणाम काही ठराविक अर्थात, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावरून दिसून येतो. देशात सद्यःस्थितीत जन्माला येणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं हे अडीच किलो वजनाच्या खाली जन्माला येत असल्याची स्थिती आहे. जगात भारतात जन्माला येणाऱ्या कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी ४० टक्के असल्याचे वैद्यकीय यंत्रणेचा अहवाल सांगतो. मुळात ही समस्या नियंत्रणात आणण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची आहे. गर्भवती राहण्यासाठी काळजी घेतली जाते. मात्र, गर्भवती राहिल्यानंतर काळजी घेतली जात नसल्याचा हा परिणाम असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. 

गर्भवतीच्या आहाराचे नियोजन स्त्रीरोग किंवा आहारतज्ज्ञांकडून काळाची गरज म्हणून तयार करून घेणे आवश्‍यक आहे. परिस्थितीनुरूप गर्भवतीचा आहार हा समतोल असावा. त्यात जे अन्न आपल्याला कार्बोहाड्रेड (ऊर्जा) (कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी) देते. प्रथिनांसाठी (प्रोटिन्स) विविध प्रकारच्या डाळी, सोयाबीन, अंडी, दूध, मांसाहार, फळे व हिरवा भाजीपाला असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून जीवनसत्त्व (व्हिटॅमिन) व तंतूमय पदार्थ (फायबर) मिळतात. गर्भवतीने दिवसभरातून किमान तीन ते चार वेळा आहार घेणे आवश्‍यक आहे.

अशक्त बाळ जन्मल्यानंतर
    बाळाच्या शरीरात चरबी कमी राहत असल्याने त्यास शरीराचे तापमान राखता येत नाही. 
    चरबी कमी राहत असल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊन बाळाला नवजात अर्भक अतिदक्षता विभागात ठेवावे लागते.
    आईच्या अंगावर स्तनपान करण्यास बाळाला ताकद नसते. त्यामुळे स्तनपानाचा प्रश्‍न निर्माण होतो. 
    पुढे वर्षभरात बाळाच्या वाढण्याच्या वजनावरून त्याची पुढील क्रिया अवलंबून असते.
    कमी वजनामुळे स्तनपानाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने बाळाला वरचे दूध पाजावे लागते. परिणामी गॅस्ट्रो व न्यूमोनिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

भावी पिढी निर्माण करण्याचा प्रारंभ हा आईच्या उदरातून सुरू होतो. सुदृढ बालक हे त्या देशाच्या आरोग्याच्या नाडीचे प्रतीक आहे. त्याची काळजी घेणे, ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.
- डॉ. प्रशांत कुटे, बालरोगतज्ज्ञ, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant Woman Ignoring balanced diet Baby Weight Effect