राष्ट्रपती दौऱ्याच्या तयारीचा जिल्हा यंत्रणेकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

नाशिक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 22 ऑक्‍टोबरला मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम्‌) (ता. बागलाण) येथे होणाऱ्या जागतिक अहिंसा संमलेनाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज बुधवारी आढावा बैठक घेत विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविल्या.

बागलाण तालुक्‍यातील श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम्‌) येथील जागतिक अहिंसा संमेलनाला राष्ट्रपतीशिवाय राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संमेलनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत, राष्ट्रपतीसह अतिमहत्त्वाच्या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षितता, ओझर येथील विमान लॅंडिंग व टेकऑफ, महोत्सवाच्या ठिकाणी हेलिपॅड उभारणे, मंडप, स्टेज, मांगीतुंगीला जोडणारे रस्ते, मैदान, वीज, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, वाहनतळासह विविध बाबींची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदींनी माहिती घेत, जिल्हा प्रशासन, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, महावितरण, आरटीओ यासह विविध विभागांची बैठक घेतली.

Web Title: President Ramnath Kovind Tour