मुद्रणालयांकडून जुन्या नोटांचाच प्रचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नाशिक - केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने 8 नोव्हेंबरपासून देशातील पाचशे व हजार रुपयांचे चलन बंद केले. विनापरवानगी बाद ठरविलेले चलन स्वीकारणाऱ्या संस्थांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागाच्या मुद्रणालय टांकसाळ महामंडळाच्या (सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन) संकेतस्थळावर मात्र अद्याप नवीन नोटांना स्थान मिळालेले नाही. जुन्याच नोटांचे चित्र तेथे आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास देशभर सगळीकडे टाळाटाळ सुरू आहे.

नाशिक - केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने 8 नोव्हेंबरपासून देशातील पाचशे व हजार रुपयांचे चलन बंद केले. विनापरवानगी बाद ठरविलेले चलन स्वीकारणाऱ्या संस्थांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागाच्या मुद्रणालय टांकसाळ महामंडळाच्या (सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन) संकेतस्थळावर मात्र अद्याप नवीन नोटांना स्थान मिळालेले नाही. जुन्याच नोटांचे चित्र तेथे आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास देशभर सगळीकडे टाळाटाळ सुरू आहे. असे असताना रिझर्व्ह बॅंकेच्या मुद्रणालयांच्या संकेतस्थळावर मात्र मुद्रणालयाचे अधिकृत चलन म्हणून अजूनही जुन्या नोटांचाच प्रचार सुरू आहे. वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालयांची स्थिती वेगळी नाही. सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन महामंडळाच्या संकेतस्थळावर तीच स्थिती आहे. नवीन छापलेल्या नोटांना अद्याप या दोन्ही संस्थांच्या मुद्रणालयांनी किंवा महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर स्थान दिलेच नाही.

Web Title: press promote old currency