देऊर ला 'पंतप्रधान पिक विमा योजना', दुष्काळ आणेवारीवर चर्चासत्र

Prime Ministers Crop Insurance Scheme at Deur Dhule
Prime Ministers Crop Insurance Scheme at Deur Dhule

देऊर - दरवर्षी पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी  व दुष्काळ जाहीर करण्यासाठी हेतुपुरस्सर स्थानिक अधिकारी,व राजकीय व्यक्ती पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी कमी दाखवितात. त्यामुळे उत्पादन कमी आल्यावर सुध्दा नुकसान भरपाई मंजूर होत नाही. पन्नास पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर झाली तरी त्यापासून शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. उलट यामुळे राज्यात पिकांची उत्पादकता कमी दिसते व या आकडेवारी वरून शासनाचे आयात निर्यात धोरण ठरत असते.

आकडेवारीवरुन उत्पादन कमी दिसते. त्या पार्श्वभूमीवर शासन आयातीचा निर्णय घेते. त्यामुळे देशातील पिकांना भाव कमी मिळतो. त्यामुळे पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी कमी न दाखवता वास्तव दाखवून प्रत्यक्ष शेतावर जाऊन खरी परिस्थिती जाणून घेतली पाहीजे. असे शेतकऱ्यांची डबल उत्पन्न समिती सदस्य, तथा पीक विमा तज्ञ, पढावद जीवनधारा उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अॅड प्रकाश पाटील यांनी सांगितले. धुळे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, नेरचे मंडळाधिकारी छोटू चौधरी, कुसुंबा मंडळ कृषी अधिकारी अमृत पवार, कृषी पर्यवेक्षक श्री. बोरसे, कृषी सहाय्यक श्री. पानपाटील, भामरे, ग्रामसेवक सुधीर भामरे, तलाठी दाभाडे, सरपंच हेमांगी देवरे, उपसरपंच दिलिप देवरे, नवल देवरे, विश्वासराव देवरे, बाबाजी देवरे, डाॅ. विजय देवरे, चंद्रकांत देवरे, दिंगबर देवरे नांद्रेचे नाना पाटील, विनायक पाटील ,उभंड, देऊर खुर्द, पिंपरखेड, म्हसदी, ककाणी, भदाणे परिसरातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी श्री. सोनवणे म्हणाले की, पीकविमा संदर्भात नुकसान झाल्यावर 48 तासाच्या आत पीकविमा कंपनी, संबंधित खाते असलेले बॅक, कृषी विभाग यांना तात्काळ माहिती देणे बंधनकारक आहे.पीकविमा ऑनलाईन झाला आहे. निश्चित केलेल्या उत्पन्नापेक्षा उंबरठा उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी आले तर तेव्हा पीकविमा मंजूर होतो. नजर आणेवारी 15 सप्टेंबर ला, 30 ऑक्टोबर ला हंगामी आणेवारी, सुधारीत आणेवारी 15 डिसेंबर व 15 जानेवारी ला केली जाते. दुष्काळाचे तीन यंत्रणेद्वारे मूल्यांकन होते. असे महसूल विभाग जून ते ऑगस्ट तीन महिन्यातील पाऊस, दर महिन्याचा पाऊस, पावसाचे विचलन यात पावसाचा चार आठवडयातील सलग खंड पडतो.तेव्हा दुष्काळाची पहिली कळ (सुरवात) धरली जाते. दुसरी कळ भूजल सर्वेक्षण यंत्रणा, तिसरी कळ कृषी विभाग माध्यमातून  सरासरी चार महिन्यातील 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळाची कळ लागू होते.

अॅड. पाटील म्हणाले की, खरीप हंगामात दोन टक्के पिक विमा हप्ता, रब्बी हंगामात दीड टक्के  विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरीत विमा हप्ता राज्य व केंद्र शासन अनुदान स्वरूपात निम्मे निम्मे भरते. नगदी पिके व फळ पिके यांच्याकरीता पाच टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो. पेरणी पासून ते कापणी पर्यंत व नंतरही कापणी नंतर शेतमाल शेतात असेल व पावसाने नुकसान झाले तर त्याला भरपाई द्यावी लागते. एका बाजुस योजना चांगली असल्यावर राज्याला 2269 कोटी रुपये मंजूर झाल्यावर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त एक कोटी 35 लाख रुपये मंजूर झाले. बेटावद महसुल मंडळाला एक कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले. ही अशी तफावत आपणच करीत असलेल्या चुकीमुळे होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे पिक विमा योजनाबाबत जे गैरसमज आहेत, ते कसे चुकीचे आहेत,ते सुद्धा उपस्थितांना सांगितले. कर्जमाफी ची खोटी आशा, विज बिल न भरणे यामुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे. प्रास्ताविक उपसरपंच दिलिप देवरे यांनी केले. 

चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये 2015 ते 2020 कालावधीत नविन निकष व वाढीव दराने भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीत नुकसानीचे प्रमाण 50 टक्के ऐवजी 33 टक्के करण्यात आले आहे. 

नजर आणेवारी कशी काढली जाते?
निरीक्षणावर आधारित ही प्रचलित पद्धत आहे. शेतीचा नैॠत भाग, प्रत्येक पिकासाठी बारा भूखंड निवडले जातात. शेतातील एक आर चौरस भाग घेऊन निघणार्या उत्पादनावर धान्याच्या उत्पादनाशी निगडीत, शेतातील विशिष्ट पिकाचे उत्पन्न काढण्यासाठी सरकारी पद्धत आहे. शेतकर्यांना मिळणारी मदत ही अधिकार्यांच्या मेहेरनजरेवरच अवलंबून आहे. 

आणेवारी समितीत कोण असतात?
मंडळाधिकारी (निरिक्षक), तलाठी, दोन अल्पभूधारक शेतकरी, प्रगतिशिल शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष, कृषी सहाय्यक, कोतवाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com