PHOTOS : अभयारण्यात कोण करतयं सारखी वटवट...'हा' तर नाही ना?

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

दंगाखोर वटवट्या, धन वटवट्या, पायमोज वटवट्या आणि रेखांकित वटवट्या, अशी त्यांची मजेशीर नावे आहेत. यातील धन वटवट्या हा पक्षी 1981 मध्ये दिसल्याची नोंद वन विभागाच्या चेकलिस्टमध्ये दिसून आली. तब्बल 30 वर्षांनंतर हा पक्षी निरीक्षण मनोऱ्याजवळ बघावयास मिळाला. या पक्ष्याची संख्या अभयारण्यात वाढल्याचे देखील दिसून आले.

नाशिक : हिवाळ्याची चाहूल लागताच गुलाबी थंडीत नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. यंदा स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. या अभयारण्यात अनेक जातीचे पक्षी आढळतात. गेल्या वर्षी आठ ते दहा नवीन पक्ष्यांची भर या यादीत पडली आहे. या वर्षीदेखील अनेक नवीन पाहुणे येथे येत आहेत. काळटोप खंड्या प्रथमच आढळला असून, आता वटवट्या या जातीच्या पक्ष्याच्या पाच जाती येथे बघावयास मिळत आहेत. 

Image may contain: bird

हेही वाचा > लाखमोलाचा "त्यांचा' जीव यामुळे वाचला...

धन वटवट्याचे 30 वर्षांनंतर दर्शन,

काही जातींनी 30 वर्षांनंतर दर्शन दिले आहे. दंगाखोर वटवट्या, धन वटवट्या, पायमोज वटवट्या आणि रेखांकित वटवट्या, अशी त्यांची मजेशीर नावे आहेत. यातील धन वटवट्या हा पक्षी 1981 मध्ये दिसल्याची नोंद वन विभागाच्या चेकलिस्टमध्ये दिसून आली. तब्बल 30 वर्षांनंतर हा पक्षी निरीक्षण मनोऱ्याजवळ बघावयास मिळाला. या पक्ष्याची संख्या अभयारण्यात वाढल्याचे देखील दिसून आले. त्यांचे खाद्य कीटक आणि ड्रेगोन फ्लायची संख्या या परिसरात वाढल्याने त्यांची संख्या वाढली असावी, असे पक्षिमित्रांचे म्हणणे आहे.

Image may contain: outdoor

हेही वाचा > स्मार्टसिटी प्रकल्प, बससेवा, टायरबेस मेट्रोचे पुढे काय? 

आठ दिवसांत पाच प्रकार निदर्शनास 

पायमोज वटवट्या हा मध्य रशियापासून पश्‍चिम चीनपर्यंत प्रजनन करतात आणि श्रीलंकेपर्यंत दक्षिणेस भारतीय उपखंडात हिवाळ्यासाठी स्थलांतर करतात. या पक्ष्याने पश्‍चिम व उत्तर फिनलॅंडच्या प्रजननाची सीमा पश्‍चिम दिशेने वाढवली आहे. दंगाखोर वटवट्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उत्तर भारतामधील प्रजनन पक्षी स्थलांतरित आहेत. द्वीपकल्प भारत आणि श्रीलंकेत हिवाळ्यासाठी ते स्थलांतरदेखील करतात. हे हळुवार, बडबड करणारे कीरेटऽऽकीरेटऽऽऽकीरेट असा आवाज काढणारे पक्षी आहेत. हे सर्व पक्षी आकाराने लहान असले, तरी त्यांच्या हालचाली थक्क करणाऱ्या आहेत. इतके लहान पक्षी स्थलांतर करून येतात. निसर्गाचा हा अनोखा खेळ न समजण्यासारखा आहे. 

Image may contain: bird, sky and outdoor

यंदा स्थलांतरित पक्षी पावसामुळे उशिरा आले.
आम्ही रोज अभयारण्यात पक्ष्यांच्या नोंदी घेत असतो. यंदा स्थलांतरित पक्षी मोठ्या पावसामुळे उशिरा येण्यास सुरवात झाली. वटवट्या पक्ष्याच्या पाच जाती आम्ही आठ दिवसांत बघितल्या व त्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून आले. - अमोल डोंगरे, गाईड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prinia socialis bird at Nandurmadhyameshwar Sanctuary Nashik Marathi News