कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नाशिक रोड ः मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचे सत्र सुरू असताना एका कैद्याकडे मोबाईल असल्याचे तुरुंगाधिकाऱ्यांना समजल्यावर संबंधित कैद्याकडे चौकशी केली असता कैद्याने तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला करत मारहाण केल्याचा प्रकार आज घडला.

कारागृहात तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार ज्ञानदेव बाबर हे सहकाऱ्यांसह कारागृहात एका खोलीजवळ जात असताना मोका कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी वेन्सील रॉय मिरिंडा ऊर्फ मॉन्टी याच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यामुळे बाबर व त्याच्या सहकाऱ्यांनी विचारपूस केली असता कैद्याने त्याच्याकडील मोबाईल जमिनीवर आपटला.

त्यानंतर मोबाईल नष्ट व्हावा, म्हणून पाणी टाकण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित कैद्याला अधिक चौकशीसाठी तुरुंग अधिकारी फड यांच्या मंडल कार्यालयात आणले असता चौकशीवेळी कैदी मॉन्टीने बाबर यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या शर्टाची कॉलर ओढून मारहाण करत धमकी दिली.

Web Title: prisoner attacks jailer