प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीचा निर्वाळा अन् रक्षा खडसेंचाही मार्ग खुला!

khadse munde
khadse munde

जळगाव : भाजपतर्फे बीड व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांची उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड येथून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीच उमेदवार निश्‍चित आहे, कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही, असे जाहीर केले आहे. त्यावरून रावेर मतदारसंघातील रक्षा खडसेंच्या भाजप उमेदवारीचा मार्गही खुला झाल्याचे मानले जात आहे. 

"शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील', असा निर्वाळा आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देऊन टाकला. त्यामुळे पक्षात व विरोधकांत अधून - मधून भाजप उमेदवार कोण, याबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

पक्षातर्फे करण्यात आलेल्या पाहणीत "डाऊन स्कोअर कार्ड'मुळे बीड मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत पक्षातील लोकांकडूनच शंका घेण्यात येत आहेत. पक्षातील हा रोख पाहूनच सावरघाट (ता. पाटोदा) येथील दसरा मेळाव्याच्या सभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावेळी उपस्थित गर्दीचा उल्लेख करून "ही गर्दी पाहून कुणी म्हणेल का की, डॉ. प्रीतम मुंडे व रक्षा खडसे निवडून येणार नाही?' असे विधान केले होते. याशिवाय भुसावळ येथे एका कार्यक्रमात आल्या असताना रक्षा खडसे यांच्या कार्यामुळे त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणारच, असेही पंकजा बोलल्या होत्या. 

दरम्यान, अमित शहांनी भाजप खासदारांची "शाळा' घेतल्यानंतर लगेच आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यांनी बीड येथे डॉ. प्रीतम मुंडे याच बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे रावेर आता रावेर लोकसभेतूनही भाजपतर्फे रक्षा खडसे यांचीच उमेदवारी कायम राहील, असे मानले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com