उपचारापूर्वीच पैसे मागितल्याने खासगी रुग्णालयात धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

जुने नाशिक - रुग्णाला दाखल करताना उपचारापूर्वी डॉक्‍टरांनी आगाऊ रकमेची मागणी केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांच्या मध्यस्थीने रुग्णाला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर चार तास चाललेल्या गोंधळावर पदडा पडला.

ठाणगाव (सिन्नर) येथील संतोष काकड यांना हृदयातील रक्तस्रावाबाबतचा त्रास जाणवत असल्याने त्यांना दुपारी एकच्या सुमारास
शालिमार येथील एका रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारापूर्वी डॉक्‍टरांनी आगाऊ 15 हजारांची मागणी केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात आला.

Web Title: private hospital confussion

टॅग्स