उत्पादन खर्च २० हजार अन्  नुकसानभरपाई ३ हजारच....

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अतिवृष्टीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, शासनाच्या या घोषणेमुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या मदतीवर तीव्र टीका होत आहे. 
खरिपासाठी हेक्‍टरी आठ हजार, तर फळबागांसाठी १५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हेक्‍टरी २५ ते ३० हजार रुपये भात शेतीला खर्च केला जातो. त्यामुळे शासनाने यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

नाशिक : जिल्हा प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले असले, तरी सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नाही. ज्यांची शेती अतिवृष्टीमुळे पूर्णत: खरडून निघाली त्यांचे केवळ 50 टक्के नुकसान पकडले जात आहे, तर 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीचे पीक वाहून गेल्याची नोंद घेण्यात येत आहे, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत. 

ताळमेळ घालायचा कसा? भात उत्पादकांसमोर प्रश्‍न 

अतिवृष्टीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, शासनाच्या या घोषणेमुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या मदतीवर तीव्र टीका होत आहे. 
खरिपासाठी हेक्‍टरी आठ हजार, तर फळबागांसाठी 15 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हेक्‍टरी 25 ते 30 हजार रुपये भात शेतीला खर्च केला जातो. त्यामुळे शासनाने यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

Image may contain: one or more people, outdoor and nature

(Photo)इगतपुरी : तालुक्‍यात अवकाळीच्या तडाख्यातून शेतकरी सावरत असला तरी भातपीक मात्र आजही चिखलातच आहे. अशा चिखलात व गाळात खोलवर पाण्यात भात सोंगणी करताना शेतकरी महिला. 

हेही वाचा >  VIDEO : चहाची तलफ लागली...एक मिस्ड कॉल अन् 'हा' हजर...

शेतकऱ्यांची थट्टा केली

मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होत असलेल्या या तालुक्‍यात पावसाने थैमान घातले. एकरी वीस हजार खर्च होत असताना शासनाने तुटपुंजी मदत करून एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. - सागर बोंबले, शेतकरी, मोडाळे 

खते, बी-बियाण्यांची उधारी मिळणे अवघड 
भाताचे कोठार असलेल्या या तालुक्‍यात यंदा पूर्ण शेतीच वाया गेली व दुकानातून शेतकऱ्यांनी नेलेले बी-बियाणेदेखील तसेच पडून आहे. त्यामुळे व्यवसायातदेखील तोटाच येत आहे, असे कांकरिया कृषी सेवा केंद्राचे पंकज गोठी यांनी सांगितले. 

हेही वाचा > "तुमच्या मुलीला फॅशन शो, फिल्मसध्ये काम देतो"...फक्त एवढचं करा..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production and compensation cost are different creates Question in front of farmers Nashik News